fbpx

चित्रप्रदर्शनातून मिळणारा निधी मेळघाटमधील महात्मा गांधी आदिवासी दवाखान्याला रुग्णांच्या उपचारासाठी देणार

डॉ .माया भालेराव यांचा नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम

पुणे :बालगंधर्व कलादालनात अंटार्क्टिका आणि निसर्ग जलरंग तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे उदघाटन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या हस्ते पार पडले
सदर प्रदर्शन हे विनामूल्य असुन पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात लोकांनी या प्रदर्शनाला उपस्थीती लावली सदर प्रदर्शनाला डॉ माया भालेराव यांनी जलरंग या माध्यमातून अनेक विध विषय घेऊन 100 हुन अधिक जलरंग चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे
अंटार्क्टिका म्हणजेच दक्षिण ध्रुव येथे जाऊन अंटार्क्टिकाच्या अचंबित करणाऱ्या निसर्गाचे हुबेहूब चित्रण करणयात आले आहे बर्फाच्छादित डोंगर ,ग्लेशिअरसे ,पेंविंगस ,बर्फमय महासागर आणि नॉर्थर्ण लाईट्स अशी अनेक चित्रे या प्रदर्शनात आहेत
सदर प्रदर्शनातील मिळणाऱ्या निधीतून डॉ.माया भालेराव व डॉ. सुधीर भालेराव हे मेळघाट मधील महात्मा गांधी आदिवासी दवाखान्यात कॅम्प आयोजित करून मोफत शस्रक्रिया करतात तसेच औषधे ,साहित्य यासाठी हा निधी वापरला जाणार असल्याची माहिती डॉ माया भालेराव यांनी दिली
सदर प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावली
या प्रदर्शन उदघाटनाला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार मिलिंद मुळीक, डॉ रवींद्र कुटे ,डॉ एच के साळे ,कॅप्टन प्रफुल्ल हुडेकर ,डॉ दिलीप कामत व डॉ राजीव यंदे यांनी उपस्थिती लावली अशी माहिती ईश्वरी भालेराव यांनी दिली

Leave a Reply

%d bloggers like this: