fbpx

‘प्रशांती’ कार्यक्रमात नृत्यातून घेता येणार तणावमुक्तीची अनुभूती

पुणे : उर्वशी कला सृष्टी डान्स अकाडमी’तर्फे आयोजित ‘प्रशांती’ या अनोख्या कार्यक्रमात रसिकांना नृत्य शिरोमणी डॉ. उर्वशी श्रीवास्तव आणि त्यांच्या शिष्या यांनी सादर केलेले विविध शास्त्रीय नृत्य प्रकार पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमांचे वैशिष्ट्य म्हणजे तणावमुक्तीसाठी उपयुक्त ठरणारे नृत्यप्रकार यामध्ये रसिकांना पाहता येणार आहे. हा कार्यक्रम ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथे होणार असून, कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.

या कार्यक्रमाबाबत डॉ. श्रीवास्तव म्हणाल्या, “ प्रशांती कार्यक्रमात मी व माझ्या शिष्या ९ संकल्पनांवर आधारित नृत्यप्रस्तुती करणार आहोत. यामध्ये ‘प्रार्थना’ हे वाद्यसंगीत आधारित नृत्य, ‘गीत गोविंद’ हे पारंपारिक ओडिसी नृत्य, गणेश वंदना, जुनं ते सोनं, पारंपारिक नृत्य, समकालीन नृत्य, निसर्ग आणि फ्युजन नृत्य यांचा समावेश आहे. भरतनात्याम, कथक, ओडिसी नृत्य अशा विविध नृत्य प्रकारांच्या माध्यमातून ही प्रस्तुती केली जाणार आहे. या कार्यक्रमात तणाव कमी करण्यासाठी आणि एकंदर व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या नृत्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘उर्वशी कला सृष्टी’ ही एक अनोखी नृत्य संस्था आहे जिथे ७ ते ५५ वयोगटातील मुलींना सर्व भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्ये शिकवली जातात.

डॉ. श्रीवास्तव यांना यूएसए येथील आयओडब्ल्यूए आणि नेदरलँड येथे डान्स थेरपीमध्ये डी.एससी आणि डी.एल.टी.च्या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी मानसशास्त्रात पीएच.डी केली आहे आणि नृत्यातील ‘स्ट्रेस रिड्युसिंग डान्स आणि डान्स थेरपी’ या अनोख्या कोरिओग्राफीसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांची ही स्ट्रेस रिड्युसिंग डान्स कोरिओग्राफी (एसआरडी) यूएसए मध्ये पेटंट झाली आहे. त्यांनी ‘स्ट्रेस मॅनेजमेंट अँड डान्स’ नावाचे पुस्तकही लिहिले आहे

Leave a Reply

%d bloggers like this: