fbpx

तर विद्यापीठ घेईल विशेष परीक्षा..!!

 

एकाच दिवशी दोन पेपर असणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचा दिलासा

पुणे:ज्या विद्यार्थ्यांच्या विद्यापीठाच्या व परीक्षा एकच दिवशी येतील, ज्यांची राष्ट्रीय स्तरावरील खेळाच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे, जे राष्ट्रीय सेवा योजना किंवा समकक्ष स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी झाले असतील व त्या परीक्षा किंवा स्पर्धा या विद्यापीठांच्या परीक्षेच्या दिवशी येत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा विद्यापीठ घेईल असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ४ जुलै रोजीच परिपत्रक क्रमांक १०४ काढून स्पष्ट केले आहे. यामध्ये परीक्षा एकच दिवशी आल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावे याबाबतच्याही सविस्तर सूचना दिल्या आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा येत्या काळात घेण्यात येत आहेत. याच काळात काही अन्य अभ्यासक्रमाच्याही परीक्षा आहेत. त्यामुळेच ज्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अन्य परीक्षा आहेत अशा विद्यार्थ्यांनी सर्व पुराव्यांसह आपल्या महाविद्यालयाकडे अर्ज करावा, विद्यापीठ अशा विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा घेईल असे म्हणत विद्यापीठाने या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. मात्र तरीही काही विद्यार्थी यासाठी रीतसर अर्ज न करता अन्य मार्गांचा अवलंब करताना दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जात याची माहिती घ्यावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेत विशेष परीक्षेबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने ४ जुलै रोजी जाहीर केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावरदेखील उपलब्ध आहे. याची माहिती न घेता जर विद्यार्थी वेळापत्रक बदलण्याची मागणी करत असतील तर ते योग्य नाही.

  • डॉ.महेश काकडे, संचालक
    परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Leave a Reply

%d bloggers like this: