fbpx

भारतातील टाइप २ मधुमेही प्रौढांसाठी सिटाग्लिप्टीन आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन सादर

पुणे :   नावीन्यपूर्णतेवर भर देणाऱ्या ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड (ग्लेनमार्क) या जागतिक औषध कंपनीने भारतातील टाइप २  मधुमेही प्रौढांसाठी परवडणाऱ्या किमतीत सिटाग्लिप्टीन  आणि त्याचे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) सादर केले आहेत. कंपनीने सिटाजीट  SITAZIT® या ब्रँड नावाखाली सिटाग्लिप्टीन आधारित औषधांचे ८ वेगवेगळे कॉम्बिनेशन आणि त्यांचे प्रकार परवडणाऱ्या किमतीत सादर केले आहेत.

ग्लेनमार्कचे  सिटाजीट  ® आणि त्याचे इतर प्रकार टाइप-२ मधुमेही रूग्णांसाठी सिटाग्लिप्टीन अधिक सुलभतेने मिळण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. डीपीपी४ इनहिबिटर थेरपीमध्ये सिटाग्लिप्टीन हे गोल्ड स्टँडर्ड मोलेक्यूल मानले जाते. यामुळे रुग्ण हे त्यांची ग्लायसेमिक पातळी प्रभावीपणे हाताळू शकतील आणि त्यामुळे अधिक चांगले कॉम्प्लायंस येईल. या औषधांमुळे हायपोग्लाइसेमियाचा धोका कमी असून बीटा सेल संरक्षण मिळते, कार्डिओ-रेनल लाभ मिळतात आणि मूत्रपिंड किंवा यकृताचे विकार असलेल्या रुग्णांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ते सुरक्षित आहेत.

ही औषधे  सिटाजीट   ( SITAZIT®) ,  सिटाजीट   – एम ( SITAZIT®- M ) ,  सिटाजीट   – एम ई आर   ( SITAZIT®- M ER ) आणि  सिटाजीट    – डी ( SITAZIT® D ) या ब्रँड नावाने उपलब्ध असतील. यापैकी प्रत्येक ब्रँडचे दोन वेगवेगळे प्रकार असतील –  सिटाजीट    SITAZIT (सिटाग्लिप्टीन) हे  ५० एमजी आणि १००  एमजी  मध्ये उपलब्ध असेल.  सिटाजीट   – एम SITAZIT® M मध्ये सिटाग्लिप्टीन (५० एमजी ) + मेटफॉर्मिन (५०० एमजी / १००० एमजी ) आणि   सिटाजीट  – एम ई आर SITAZIT® M ER मध्ये सिटाग्लिप्टीन (१०० एमजी ) + मेटफॉर्मिन एसआर  (५०० mg/ १००० mg) असेल.  सिटाजीट    – डी SITAZIT® D हा ब्रँड दोन प्रकारांतील एक नवे कॉम्बिनेशन असून त्यामध्ये   सिटाजीट   – डी SITAZIT® D १००/१० या प्रकारात सिटाग्लिप्टीन (  १००  एमजी ) + डॅपाग्लिफ्लोझिन (१० एमजी ) आणि  सिटाजीट   – डी SITAZIT® D ५०/५ मध्ये सिटाग्लिप्टीन (५० एमजी ) + डॅपाग्लिफ्लोझिन ( ५ एमजी ) असेल.

टाइप २ मधुमेहासारख्या जुनाट आजारांमध्ये रुग्णांना मधुमेहाशी लढणारी अनेक दीर्घकाळ औषधे घेणे आवश्यक ठरते. शिवाय, भारतात रुग्णांना औषधाचा खर्च स्वतःच करावा लागतो आणि त्यामुळे उपचार व्यवस्थित होण्यामध्ये औषधाची किंमत हा एक प्रमुख घटक ठरतो. ग्लेनमार्कच्या सिटाग्लिप्टीन आणि त्याच्या एफडीसीची किंमत भारतातील त्याच्या इनोव्हेटर ब्रँडच्या किंमतीच्या एक तृतीयांशने कमी आहे.

ग्लेनमार्कने २०१५  मध्ये आपले डीपीपी4 इनहिबिटर – टेनेलिग्लिप्टीन लाँच करून डायबिटीज औषधांच्या बाजारात क्रांती घडवून आणली होती. याची किंमत त्यावेळी भारतात उपलब्ध असलेल्या इतर डीपीपी४  इनहिबिटरपेक्षा अंदाजे ५५ टक्के  कमी होती. तीच परंपरा पुढे चालू ठेवत ग्लेनमार्कने २०१९ मध्ये जागतिक स्तरावर संशोधन केलेले इनोव्हेटर मोलेक्यूल रेमोग्लिफ्लोझिन सादर केले. ते त्यावेळी भारतीय बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या इतर एसजीएलटी२  इनहिबिटरपेक्षा सुमारे  ५५ टक्के   स्वस्त होते. त्यानंतर २०२० आणि २०२१  या वर्षांमध्येही अनुक्रमे रेमोग्लिफ्लोझिन + विल्डाग्लिप्टिन एफडीसी आणि रेमोग्लिफ्लोझिन + विल्डाग्लिप्टिन + मेटफॉर्मिन एफडीसी लाँच करणारी ग्लेनमार्क ही जगातील पहिली कंपनी बनली.इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशनच्या (आयडीएफ) अंदाजानुसार, भारतात मधुमेहाचा प्रसार ८. ३ टक्के  आहे आणि २०२२  पर्यंत सुमारे ७४ दशलक्ष प्रौढ लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: