टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेला अटक

मुंबई : शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी टीव्ही अभिनेत्री केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. कळवा पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल असून आज संध्याकाळी ठाणे पोलिसांकडून  केतकी चितळेला अटक करण्यात आली.

केतकी चितळेनं तिच्या फेसबुक आकाऊंटवर ही आक्षेपार्ह पोस्ट शेअर केलीय. अॅडव्होकेट नितीन भावे नावाच्या व्यक्तीनं शरद पवार यांना उद्देशून लिहिलेली ही पोस्ट आहे. शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेवरून केलेल्या वक्तव्यानंतर पवारांवर आक्षेपार्ह भाषेत टिपण्णी असलेली ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

केतकी चितळे हिला नवी मुंबई पोलिसांनी कळंबोली येथून ताब्यात घेतले आहे. तिचा शोध ठाणे गुन्हे शाखा करत होती. आता ठाणे गुन्हे शाखेची टीम रवाना झाले असून तिला नवी मुंबई पोलिसांकडून ठाणे गुन्हे शाखा ताब्यात घेणार आहे. सध्या कळंबोली इथे असलेल्या तिच्या मावशीच्या घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. नवी मुंबई पोलिसांकडून ताबा मिळाल्यानंतर केतकी हिला ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणले जाणार आहे. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: