महागाईच्या भस्मासुराची आम आदमी पक्षाने काढली अंतयात्रा
वाढत्या महागाई विरोधात आम आदमी पक्षाची निदर्शने
पुणे : आज आम आदमी पक्षातर्फे स्वारगेट चौक येथे निदर्शने करण्यात आली. एप्रिल महिन्यात महागाई चा दर हा मागील आठ वर्षातील सर्वाधिक दर ठरला. तसेच इंधनाचे चढते भाव, १००० रुपयांना भिडलेले गॅस सिलेंडर चे भाव, भाजीपाला ई. गोष्टींच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. महागाई आटोक्यात आणण्यात केंद्रातील मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, अशी भूमिका यावेळी पक्षाने मांडली.
यावेळी केंद्र सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध म्हणून महागाईच्या भस्मासुराची प्रतीकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोनावणे, युवा आघाडी अध्यक्ष महेश स्वामी, उपाध्यक्ष हर्षदा मोहोड, अभिजित गायकवाड, शाहीन पठान, ललिता गायकवाड, निलेश सोनवणे, कोमल फाले, मोहनसिंग राजपुत, सतीश यादव, एस एम अली, दिगंबर राठोड, श्रीधर पाटील, अक्षय सुतार, संदीप सूर्यवंशी, नौशाद अन्सारी, मनोज थोरात, आशुतोष शिपलकर, पैठणकर, समीर पुराणिक, प्रणित तावरे, प्रवीण बहिर, सुनील सावदी, अब्दुल गफार, संतोष पाटोळे, वैभव यादव, किरण कांबळे, योगेश इंगळे, संजय रणधीर, समीर अरवडे.उपस्थित होते.