भाजपच्या विनायक आंबेकरांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण
पुणे : भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली.
दोन दिवसांआधी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आंबेकर यांनी पोस्ट केली होती. या वादग्रस्त पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आज शहरात आंबेकर यांना मारहाण झाली.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली आहे. विनायक आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. त्यामुळे पुण्यातील राजकारण हे चांगलेच तापले असल्याचे दिसत आहे.