शिवसेनेच्या वतीने गॅस सिलेंडरला फाशी देऊन महागाईचा निषेध

पुणे : ज्याप्रमाणे श्रीलंकेच्या सत्ताधारी नेत्यांना नागड करून जनतेने सरकारचा निषेध केला त्याच प्रकारे गॅस महागाईच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्र्यांचे कपडे फाडून जनाक्रोष करण्याची वेळ देशात निर्माण होते की काय..! अशी भीती शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केली.

शिवसेना पुणे शहराच्या वतीने महागाई विरोधात शहरातील प्रत्येक प्रभागात आंदोलन करण्यात आले. त्याच क्रमांत शिवसेना प्रभाग क्रमांक १७ दांडेकर पूल येथे कसबा विधानसभा उपप्रमुख प्रसाद काकडे व महिला आघाडीच्या प्रज्ञा प्रसाद काकडे यांच्या नेतृत्वाखाली गॅस सिलेंडर व इंधन महागाईचा पुतळा उभारून त्याला फाशी देण्यात आली. या वेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकूडे, उपशहर संघटक उमेश गालिंदे, नंदू यवले, नितीन रावळेकर, रमेश लडकत, अनंत घरत, राजेश मांढरे, देवेंद्र शेळके महिला आघाडीच्या किर्ती मोहळ, स्वाती मोहळ, वैजयंती फाटे, मनीषा गरूड, मनिषा फाटे, युवासेनेचे युवराज पारिख, विलास नावडकर, ओंकार मालुसरे, राहुल बामणे, निलेश ओहाळ, सागर काळे, तेजस ननावरे, विक्रम रणदिवे, अमित चव्हाण,राज भोसले आदींच्या उपस्थित शिवसैनिकांनी केंद्र/मोदी सरकारच्या विरोधात हल्ला बोल करून गॅस व इंधन वाढीचा तीव्र विरोध करण्यात आला. तसेच आंदोलनात महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना, जेष्ठ शिवसैनिक, बालगोपाळ या प्रभागातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी होते.

प्रज्ञा प्रसाद काकडे म्हणाल्या, आजच्या महागाईच्या काळात गोर गरिबांनी जगायचं कसे? हा मोठा प्रश्न नागरीकांना पडला असून मोदी ९सरकार स्वतःच्या राजकीय व निवडणूकीच्या फायदयासाठी सत्तेचा गैरवापर करून जनतेच्या भावनांचा खेळ मांडत आहेत यांचा मी निषेध करतो. येत्या काळात हीच जनता तुम्हाला घरचा दरवाजा दाखवून देईल याच भान मोदी सरकारने ठेवून काम करावे असा सल्ला देखील काकडे यांनी केंद्र सरकारला दिला.

Leave a Reply

%d bloggers like this: