सासवड एफसीचे जुन्नरविरुद्ध आठ गोल

पुणे : ४ लायन्स आणि पुणे पायोनिर्स यांच्यातील १६ वर्षांखालील गटातील साखळी लढत ४-४ अशी बरोबरीत सुटली. पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेच्या लीग स्पर्धेत द्वितीय श्रेणीत सासवड एफसी संघाने जु्न्नर तालुका संघावर ८-१ असा विजय मिळविला.

म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या सी गटातील सामन्यात अथर्व खडतरेच्या (३०, ३५, ३९वे मिनिट) हॅटट्रिकच्या जोरावर पुणे पायोनिरने ११ खेळाडूंसह खेळताना ४ लायन्सला ४-४ असे बरोबरीत रोखले. ४ लायन्सकडून अजय बंजात्री (१६वे, ३८वे मिनिट) आणि परिक्षीत गव्हाणकर (३९वे मिनिट), निपुणे बांगड (६०वे मिनिट) यांनी गोल केले. पुणे पायोनिर्सचा एकगोल विघ्नेश कदमने २६व्या मिनिटासला केला.

तृतिय श्रेणीतील एसएसपीएमएस मैदानावर झालेल्या सामन्यात सासवड एफसी संघाने ई गटातील सामन्यात जुन्नर तालुका संघावर ८-१ असा विजय मिळविला. संमित्रा मिसाळने २२, ४० आणि ४७व्या मिनिटाला तीन गोल केले. त्याला मिहिर पवारने २१, ५९वे, प्रणव झेंडे २७वे, शोएब शेख ३१वे आणि माधन महामुनी ६२वे मिनिट यांनी गोल करून सुरेख साथ दिली. या सगळ्यांच्या प्रयत्नांनी सासवडचे गोलाधिक्य वाढू शकले. जुन्नरसाठी एकमात्र गोल प्रसाद कबाडी याने सातव्या मिनिटला केला.

स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या ड गटातील सामन्यात खडकी ब्ल्यूज संघाने सुखाई एफसीचा ३-२ असा पराभव केला. सलमान सलमानी याने ५१वे, गगन बोगर १७नवे मिनिट, साहिल काकडे २२वे मिनिट यांनी गोल केले. पराभूत संघाच्या सुखाईकडून अमोल वाघमारे (३८वे) आणि यश अगरवाल (४३वे मिनिट) यांनाच गोल करता आले.

Leave a Reply

%d bloggers like this: