fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

महाज्योती मार्फत बारा बलुतेदारांनसाठी लवकरच व्यवसायिक मार्गदर्शन वर्ग – चेतन शिंदे

नागपूर : आज राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे अध्यक्ष चेतन शिंदे यांनी महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे यांची भेट घेतली. शिंदे गेली वर्षभर झाली बारा बलुतेदार युवा वर्गासाठी कौशल विकास साठी त्यांना विविध व्यवसायिक मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यासंदर्भात डांगे यांच्याकडे पाठपुरावा करत होते. त्याचाच भाग म्हणून आज डांगे यांनी सदर योजनेला पुढच्या आठवड्यात मान्यता देण्या संदर्भात शिंदे यांना आश्वासन दिले. या संदर्भात येत्या २४ जुलै २०२१ रोजी सदर योजने बाबत शिंदे यांनी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचे मार्गदर्शनात प्रस्ताव सादर केला होता. या योजनेचा फायदा सर्व बारा बलुतेदार युवा वर्गाला होईलच शिवाय सदर योजनेमुळे अस्तंगत होत असलेल्या कला पुनरूज्जीवीत होण्यास मदत होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading