fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पं. हरिप्रसाद चौरसियांच्या बासरी वादनाची भुरळ

पुणे : ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी जन्मशताब्दी संगीत महोत्सवा’च्या दुसऱ्या सत्रात जगविख्यात बासरीवादक पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध गेले. त्यांनी राग वाचस्पतीमध्ये ताल रुपक सादर केला. त्यांना बासरीवादन साथ वैष्णवी जोशी आणि सौरभ वर्तक आणि अमृता उप्रेती यांनी दिली. तर तबला साथ अनुतोष देघारिया यांनी दिली.
यानंतर जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका व डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर यांचे गायन झाले. त्यांनी जयपूर घराण्याचा राग रागेश्रीमध्ये बंदिश ‘आली मै जागी सरगी रैन’ आणि राग खंबावतीमध्ये दृत बंदिश ‘रे निर्मोही सजना तोसे नेहा लहागे’ सादर केली. त्यांना तबला साथ अजिंक्य जोशी यांनी तर संवादिनी साथ अभिनय रवंदे यांनी दिली. तानपुरा साथ नितीन महाबळेश्वर, वेदवती परांजपे आणि ईश्वरी श्रीगार यांनी तानपुरा साथ दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading