fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

कोथरूड मधील एकही नागरीक धान्यापासून वंचित राहता कामा नये – चंद्रकांत पाटील

कोविडनंतर रेशनिंग कमिटीची बैठक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

पुणे : कोथरूड मधील एकही रेशनकार्ड धारक मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहता कामा नये, अशा सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रेशन दुकानातून धान्य वाटपातील अडथळे पुढच्या दहा दिवसांत दूर करुन, त्याचा अहवाल बैठकीत सादर करा, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

कोथरूड विधानसभा मतदारसंघाची कोविड काळानंतरची रेशनिंग कमिटीची पहिली बैठक चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रातील टाटा सभागृहात झाली. या बैठकीस माजी नगरसेवक दीपक मानकर, बाबूराव चांदेरे, पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाने, वैशाली मराठे, नायब तहसीलदार संगीता खोमणे, पुरवठा निरीक्षक स्नेहा इंगळे, सहाय्यक नायब तहसीलदार रमेश कदम, माया भोसले, आरती गायकवाड, सौ. चिवटे, दत्ता गोडव, सुनिता पवार, मधुकर भगत यांच्यासह महिला बचतगटाच्या महिला आणि रेशन दुकानदार उपस्थित होते.

या बैठकीस उपस्थितांपैकी काहीजणांनी रेशनिंग संदर्भातील समस्यांचा पाढा वाचला. यात प्रामुख्याने रेशन कार्ड असूनही काही शिधापत्रिका धारकांना धान्य न मिळणे, एखादे रेशन दुकान बंद झाल्यानंतर त्या दुकानाअंतर्गत येणाऱ्या शिधापत्रिका धारकांना याची माहिती मिळाली नसल्याने त्यांचे रेशन कार्ड बंद होणे, नवीन शिधापत्रिका धारकांचे नाव संबंधित भागातील रेशन दुकानदारांकडे वर्ग न झाल्याने त्यांना सुविधेपासून वंचित रहावे लागणे, तसेच असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या थम्ब इम्प्रेशनच्या अडथळ्यामुळे त्यांना धान्यापासून वंचित रहावे लागणे, आदींचा समावेश होता.

वरील सर्व अडथळे तातडीने दूर करावेत, आणि शिधापत्रिका धारकांना धान्य वाटप सुरू करावे. तसेच वरील सर्व अडथळे पुढील बैठकीपर्यंत सोडवून त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading