खास रेच्या ‘KGF – कष्ट घाम फुटस्तर’ सिरिजबद्दल हे माहीत आहे का..?

Violence Violence Violence. I Don’t Like It, But Violence likes Me I Can’t Avoid. बसं एक डायलॉग ही काफी हे..! बरोबर ओळखलं मित्रांनो. केजीएफ २ मधला सगळ्यांचा आवडता डायलॉग..मंडळी, कित्येक दिवसांपासून चातकाप्रमाणे वाट पहावी तशी केजीएफ २ ची आपण सगळेच वाट पाहत होतो. आणि शेवटी सिनेमा रिलीज झाला. संगळीकड झालं केजीएफमय वातावरण. सिनेमाने अक्षरशहा संपूर्ण भारतात धिंगाणा घातला. सिनेमानी तूफान गल्ला जमवला. पब्लिकने पण तूफान रिस्पॉन्स ह्या सिनेमाला दिला. कुणाला आवडला तर कुणाला नाही आवडला. पण सगळ्यांनी आवर्जून थेटरात जाऊन पाहिला. सोशल मिडियावर तर सगळीकडे Violence Violence Violence चे मीम, रिल्स, व्हिडिओ आपल्याला पहायला मिळाले.
एकंदरीत सिनेमाने राडा केलाय मंडळी.. नुसता राडाच नाय तर ह्या सिनेमाच्या रॉकीभाईचा, त्याच्या डायलॉगचा, त्याच्या दाढीचा, त्याच्या स्टाइलचा ट्रेंडच आला. आणि आत्ताही आहे.
आता कोणताही ट्रेंड आला म्हंटल्यावर मराठीतला सुप्रसिद्ध युट्यूब चॅनल खास रे टीव्ही काय करणार नाय असं होणार नाय.. कारण मंडळी या आधी पाहिलं आपण मनी हाइस्ट चा ट्रेंड असो ब्राऊन मुंडेचा असो किंवा ट्रॅम्पचा असो. ट्रेंडवर नवीन क्रिएटिव्ह काही करून खास रेच ट्रेंडिंगला येणार नाय असं होणारच नाय. कारण ट्रेंड कसा आणायचा आणि ट्रेंडचा फायदा कसा करून घ्यायचा हे बेला चाव च्या चालीवरचं लस घ्या असो किंवा ब्राऊन मुंडेवरच गावरान मुंडे गाणं असो ह्या गाण्यांच्या व्हीव्जच्या अकड्याने खास रे दाखवून दिले आहे.
पण जर मित्रांनो, KGF चा रॉकी भाई जर MPSC चा विद्यार्थी असता तर..? त्याने कसा अभ्यास केला असता..? कुठं राहिला असता..? परीक्षेची तयारी कशी केली असती..? असे अनेक प्रश्न तयार होऊन आपल्या डोळ्यांसमोर एक KGF चं MPSC VERSION उभं राहत आणि वाटत ह्या विषयावर काहीतरी यायला पाहिजे काय..
अहो मंडळी, यायला पाहिजे काय… आलंय.. आपल्या खास रे टीव्ही ने हा अनोखा प्रयोग आपल्यासाठी सिरिजच्या माध्यमातून आणलाय.. खास रे टीव्ही म्हंटल की व्हिडिओच्या टायटलपासून नावीन्यपूर्ण हुमरस, हटके पाहायला मिळत.. KGF चा फूल फॉर्म आहे ‘कष्ट घाम फुटूस्तर’. आहे का नाय कडक टायटल मित्रांनो.. फूल फॉर्म मधूनचं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य कळून येतंय.. घाम फुटूस्तर कष्ट स्पर्धा परीक्षा देणाऱ्याला करावे लागतात..
खास रेच्या ह्या सिरिजचे तीन एपिसोड येणार आहेत.. स्पर्धा परीक्षेचे तयारीसाठी लांबून लांबून बरीच पोरं पुण्याच्या सदाशिव पेठेत येतात. ती पोरं अभ्यास कसा करतात. त्यांच ह्या दिवसांमधल आयुष्य कसं असत. तयारी करत असताना कोणत्या समस्यांचा सामना त्यांना कारायला लागतो. एकंदरीत गांव सोडून पुण्यात आल्यानंतर त्यांच आयुष्य कसं असतं. याबद्दल ही संपूर्ण सिरिज असणार आहे.
काही दिवसांपूर्वी खास रे ने ह्या सिरिजचा ट्रेलर आपलोड केला.. ट्रेलरमध्ये तो गाववरून शहरात येतोय, त्याच्या आईला त्याच्याबद्दल वाटणारी चिंता, शहरात आल्यानंतर क्लास निवडण्याचा निर्णय, अभ्यास, हॉस्टेल, क्लासेसमधले दोन प्रतिस्पर्धी, ग्राऊंडवरची धमाल, असं सगळ काही हयूमरस पद्धतीचा केजीएफ आपल्याला दिसतोय..त्या ट्रेलरला तूफान प्रतिसाद तमाम महाराष्ट्राने दिला. अनेकजणांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
खास रेवाले सिरिज करतायत आणि गाणी नाहीत..? असं होणारच नाय.. तीन गाणी ह्या सिरिजमध्ये आहेत. विशेष म्हणजे गाण्यांचा ट्रेलर वगैरे न टाकता डायरेक्ट आपल्या पुढ्यात तिनही गाणी ठेवलीयेत..’सलाम पीएसआय’, ‘गली बोळातून’, आणि ‘घासा घासा’ ही तीन ह्युमरस गाणी सुद्धा खास रेने आपलोड केली. ह्या गाण्यांना देखील तूफान असा प्रतिसाद मिळाला..
तर मंडळी, खास रे टीव्हीच्या ह्या KGF – ‘कष्ट घाम फुटूस्तर’ ह्या सिरिजचा १० तारखेला पहिला एपिसोड, १५ तारखेला दुसरा एपिसोड, आणि २० तारखेला तिसरा एपिसोड येणार आहे.. ही तीनही एपिसोड खास रे टीव्ही ह्या युट्यूब चॅनलवर येणार आहेत.. तर पाहायला विसरू नका..KGF – कष्ट घाम फुटूस्तर..!

Leave a Reply

%d bloggers like this: