fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उत्तर प्रदेश, बिहारी लोकांसाठी जी भूमिका घेतली होती. त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा की नाही हा त्यांचा सर्वस्वी निर्णय – चंद्रकांत पाटील

पुणे : राज ठाकरेंनी यांनी उत्तर प्रदेश, बिहारी लोकांसाठी जी भूमिका घेतली होती. त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा की नाही हा त्यांचा सर्वस्वी निर्णय असल्याचं वक्तव्य भाजप चे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यातील पत्रकार परिषदेत केले .

या पत्रकार परिषदेला पुणे शहर भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.
उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नसल्याचा’ इशारा उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,भाजप खासदारांने मांडलेली भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे, ती पक्षाची भूमिका नाही. त्या खासदाराला योग्य ती समज दिली जाईल. राज ठाकरेंनी जी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकांसाठी जी भूमिका घेतली होती. त्या बद्दल त्यांनी खेद व्यक्त करावा की नाही हा त्यांचा सर्वस्वी निर्णय आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले ,ओबीसी आरक्षणाबाबत निकाल याच्यापेक्षा वेगळा येणं अपेक्षित नव्हतं. कोर्टाने इम्पेरीकल डेटा मागितला होता. महाविकास आघाडी सरकारने काही केलं नाही. एक आयोग नेमावा असं देखील सांगितलं होतं. मात्र, अजूनही तो आयोग नेमला नव्हता, मागासवर्गीय आयोग नाही इम्पेरीकल डेटा नाही. गांभीर्याने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. आम्ही तुम्हाला आरक्षण देणार आहोत हे फक्त सांग दरवेळेला फसवत आहेत. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय हे सगळ्यांच्या समोर असून या सरकारने ओबीसी समाजाला फक्त लॉलीपॉप दाखवत असल्याचं ते म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading