‘खोटं बोल पण रेटून बोल’, ही शिवसेनेची नवी संस्कृती; केशव उपाध्येंचा टोला

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून राज्य सरकारचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत.”खोटं बोल पण रेटून बोल”, ही शिवसेनेची नवी संस्कृती आहे.
अशी टीका भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

२०१७-१८ पासून जीएसटी लागू झाला तेव्हापासून २०२०-२१ पर्यंत कुठलाही परतावा केंद्राकडून राज्याला बाकी राहिला नाही. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात १३ हजार ६२७ कोटी राज्याला द्यायचे आहेत. जीएसटी कौन्सिलप्रमाणे येत्या ऑगस्टपर्यंत ते पैसे सरकारला देण्यात येतील. परंतु महाराष्ट्राकडे कोळसा थकबाकी आणि रेल्वे यांची ११ हजार कोटींची थकबाकी राज्य सरकारची केंद्राकडे आहे. त्याबाबत मुख्यमंत्री मूग गिळून गप्प का बसलेत? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

तसेच मोदींच्या नावावर मतं मागितली, युतीत गद्दारी करत भ्रष्टवाद्यांशी हातमिळवणी केली. परंतु राज्य सरकारच्या कारभाराकडे कुणाचं लक्ष जावू नये म्हणून सातत्याने टोमणे बॉम्ब मारायचे आणि खोटं सांगायचं ही सोंग बंद करा. असा टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: