प.पु,गच्छाधिपती अभयदेव सुरीश्वरजी यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण व महामांगलीक संपन्न.

पुणे : प.पु. गच्छाधिपती अभयदेव सुरीश्वरजी यांचे ७४ व्या वर्षात पदार्पण झाले. तसेच त्यांचे मार्गदर्शन- महामांगलीक संपन्न झाले. श्री गोडीजी पार्श्वनाथ मंदिर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आचार्य भगवंत मोक्षरत्न सुरीश्वरजी,अध्यक्ष भरतभाई शहा,अशोक शहा,सुधीर शहा,राजीवभाई शहा,प्रकाश धारीवाल,देवीचंद जैन,एस के जैन,कांतीभाई जिरावला रा.स्व.संघ पश्चिम विभाग संपर्क प्रमुख कैलास सोनटक्के आदी मान्यवरांच्या बरोबरच मुनीगण,साध्वी व हजारो जैन भाविक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन चिराग दोशी यांनी केले. तर व्यवस्था जैन अॅलर्ट ग्रुप व जिनवाणी परिवार यांनी केले. संगीत व सूत्रसंचालन संगीतकार अनिल गेमावत यांनी केले. आगामी चातुर्मास प.पु गच्छाधिपती अभयदेव सुरीश्वरजी महाराज साहेब व आचार्य भगवंत मोक्षरत्न सुरीश्वरजी यांचा उपस्थितीत संपन्न होतील याचे संचालन गोडीजी पार्श्वनाथ मंदिर ट्रस्ट प्रकाश धारीवाल यांच्या सहकार्याने करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या समारंभास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे,गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल व रा.स्व.संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी शुभेच्छा संदेश दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: