fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पावसाळ्यापूर्वी पुण्यातील सर्व रस्ते युद्धपातळीवर पूर्ववत करणे आवश्यक – जगदीश मुळीक

पुणे : शहरातील प्रलंबित कामांसंदर्भात आज शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या शिष्ट मंडळाने मनपा आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी “संपूर्ण शहरात रस्त्यांची अत्यंतिक दुरावस्था झाली असून. पावसाळ्यापूर्वी पुण्यातील सर्व रस्ते युद्धपातळीवर पूर्ववत करणे आवश्यक आहे” असे जगदीश मुळीक म्हणाले.

जगदीश मुळीक म्हणाले, पावसाळापूर्व नालेसफाई, ड्रेनेज व पावसाळी लाईन सफाई ही कामे पूर्ण झाली नाहीत तर शहरात पावसाळी पाणी तुंबण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतील आणि त्यातून दुर्घटना होण्याची शक्यता मोठी आहे. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी आपत्कालीन व अत्याधुनिक यंत्रणा उभी करावी. तसेच धोकादायक इमारती व घरांना संभाव्य धोक्याची सूचना देण्यात यावी.

शहरात पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे त्यावर जगदीश मुळीक म्हणाले, शहरातील अनेक ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून तो पूर्ववत करण्यात यावा. तसेच समाविष्ट गावांमध्ये होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर तातडीने मार्ग काढून तेथील पाणीपुरवठ्याची अडचण दूर करावी.  शहरातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जलपर्णी साचल्याने डासांची प्रचंड पैदास होत आहे. त्यामुळे साथीच्या रोगांचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला असून ही जलपर्णी तातडीने काढण्याची व्यवस्था व्हावी आणि डास निर्मूलन अभियान तातडीने राबविण्यात यावे, असे जगदीश मुळीक म्हणाले.

मनपा अंदाजपत्रका संदर्भात नागरिकांच्या सूचना घेऊन त्या अंदाजपत्रकाप्रमाणे विविध कामांची आर्थिक तरतूद करून या कामांना गती देण्यात यावी, अशी मागणी जगदीश मुळीक यांनी केली.

जगदीश मुळीक म्हणाले, शहरातील प्रत्येक प्रभागात असे अनेक विषय प्रलंबित असून त्यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. सर्व प्रभाग कार्यालयातील प्रत्येक अधिकाऱ्यांना या सर्व कामांची जबाबदारी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करून देण्यात येऊन त्याची कालमर्यादा आखण्यात यावी. आपण स्वतः या सर्व विषयात जातीने लक्ष घालून या सर्व समस्या निश्चित कालावधीत दूर होतील याचा पाठपुरावा करावा अशा विविध विषयांवर आयुक्तांसमवेत सकारात्मक चर्चा झाली. असे जगदीश मुळीक म्हणाले.

या पत्रकार परिषदेला भाजपचे पुणे प्रवक्ते संदीप खर्डेकर, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, भाजपचे सरचिटणीस राजेश पांडे उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading