fbpx
Thursday, April 25, 2024
ENTERTAINMENTLatest News

कंगना रनौत च्या ‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित!

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाते. तिचा हाच धमाकेदार अवतार घेऊन कंगना लवकरच ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची बऱ्याच दिवसापासून प्रेक्षक वाट पाहत आहेत. दरम्यान प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘धाकड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच व्हायरल होताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये कंगना रणौत ‘एजंट अग्नी’ची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये कंगनाचा जबरदस्त अवतार पाहायला मिळत आहे. कंगणाला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे चाहतेही उत्सुक झाले आहे. ट्रेलर पाहून चित्रपटात काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार असा अंदाजही वर्तवला जात आहे.

दरम्यान, ‘धाकड’ या चित्रपटात कंगना व्यतिरिक्त अभिनेता अर्जुन रामपालही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात तो खलनायकाच्या भूमिकेत असून तो एक आंतरराष्ट्रीय ह्यूमन आणि आर्म ट्राफिकर आहे. कंगना रणौतचा हा चित्रपट येत्या २० मे ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तर मग मित्रांनो सज्ज राहा. धाकड लवकरच तुमच्या भेटीला येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading