fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न 2 वर्षांपासून सुरू – नाना पटोले

 

पुणे : महाराष्ट्राला अस्थिर करण्याचा प्रयत्न 2 वर्षांपासून सुरू आहे. भाजपचे केंद्रातील सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलं. ते पाप लपविण्यासाठी वातावरण खराब करण्याचं काम केंद्र सरकार आणि केंद्र सरकारकडून सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात केला आहे.
ज्या पक्षाचं नाव भाजपकडून घेतलं जातं त्या पक्षात काय घडतं आहे हे आम्हाला कसे कळणार ?अंधारात कोणाची काय खलबतं चालतात याच्याही आम्हाला काही देणं घेणं नाही…राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. ही भूमिका पुण्यातून आलेली आहे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता नाना पटोलेंनी टाला लगावला आहे.
आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी जो निर्णय घेतला तो आम्ही पाळतो. त्यांच्या पक्षात काय गडबडी होतात ते आम्ही बघायचं काही कारण नाही तो त्यांचा विषय ..आम्ही दुसऱ्यांच्या घरात डोकावत नाही, असेही राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलाताना पटोले म्हणाले.
अंधारात काय खलबत झाली त्याची माहिती आम्हाला नाही. केंद्र सरकार महागाई कमी करणार नाही हे स्पष्ट आता राज्य सरकारनेच दिलासा द्यावा, असेही मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading