आम्ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार नाही-देवेंद्र फडणवीस

पुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावाच्या परिस्थितीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. खुद्द भाजपचे नेते अनिल बोंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ही मागणी केली आहे.
त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

भाजप नेत्यांची राष्ट्रपती राजवटीची मागणी जोर धरत असतानाच त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे, असं सांगतानाच भाजप हा लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करणार नाही, अशी सारवासारव देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

पुण्यात संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी केली असेल. मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे. पण भाजपा ही संघर्ष करणारी पार्टी आहे. आम्ही अशी मागणी करण्याचं काहीच कारण नाही. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय हा राज्यपाल घेतात. मात्र आम्ही लढायला तयार आहोत, असं फडणवीस यांनी सांगितलं.

Leave a Reply

%d bloggers like this: