‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी’ची घोषणा

पुणे : पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनित बालन आणि भारतीय क्रिकेटर केदार जाधव यांनी एकत्रितरित्या ‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी’ ची पुणे शहरामध्ये सुरूवात करत असल्याची घोषणा आज करण्यात आली.

यावेळी पुनीत बालन ग्रुपचे चेअरमन पुनीत बालन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू केदार जाधव यांनी सांगितले की, पुणे शहराला क्रिकेटचा ऐतिहासिक वारसा आहे. या शहराने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय किर्तीचे खेळाडू निर्माण केले आहेत. पुण्यातील युवा आणि गुणवान खेळाडूंना आपल्या गुणकौशल्याचा विकास करून त्यांना आपली कारकिर्द घडवण्याच्या हेतूने या अ‍ॅकॅडमीची सुरूवात करण्यात येत आहे. ही अ‍ॅकॅडमी सध्या कोथरूड येथे सुरू असून पुनीत बालन ग्रुपने या अ‍ॅकॅडमीला सक्रीय पाठींबा दिला असून ‘पुनीत बालन – केदार जाधव क्रिकेट अ‍ॅकॅडमी’ या नव्या पर्वाची सुरूवात होत आहे.

पुनीत बालन यांनी सांगितले की, पुनीत बालन ग्रुप आणि क्रिकेट याचा फार जवळचा संबंध आहे. पुण्यातील क्रिकेट क्षेत्रामध्ये पुनीत बालन गु्रपच्यावतीने १२, १४ आणि १७ वर्षाखालील मुलांसाठी, मुलींसाठी तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील खेळाडूंसाठी अनेक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे. आणि आता पुनीत बालन ग्रुपच्यावतीने क्रिकेटची अ‍ॅकॅडमी सुरू करण्यात येणार आहे. तसेच सायकलिंग, तायक्वांदो, शुटिंग, खो-खो, लॉन टेनिस, हँडबॉल, बॅडमिंटन, टेबल टेनिस या क्रिडाप्रकारातील खेळाडूंना आर्थिक पाठींबा दिला जातो.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू आणि महाराष्ट्र रणजीपटू केदार जाधव यांनी सांगितले की, मी माझ्या क्रिकेटचा श्री-गणेशा पुण्यातूनच केला आणि येथूनच माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरूवात झाली. क्रिकेटचे धडे घेत मी भारतीय क्रिकेट संघापर्यंत पोचलो. क्रिकेटच्या दोन फॉरमॅटमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय सामने तसेच एकदिवसीय वर्ल्ड कपमध्येही खेळलो. या अ‍ॅकॅडमीमधून असे अनेक गुणवान खेळाडू घडावे आणि त्यांना त्यांची ‘इनिंग’ खेळायची संधी मिळवी, अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या वाटचालीमध्ये आमच्या या अ‍ॅकॅडमी महत्वाचा वाटा असेल, असा विश्‍वास मला वाटतो.

Leave a Reply

%d bloggers like this: