fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRA

अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पुणे पोलीस करणार अटक 

पुणे : दोन वर्षांपूर्वी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत छत्रपती उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्याविरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त भावना तयार झाल्या होत्या. तसेच गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षण प्रकरणात माध्यमांशी बोलताना केलेल्या वादग्रस्त वक्तव्या विरोधात आता पुण्याातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात देखील सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता सदावर्तेंना सातारा पोलीसाच्या कोठडीनंतर पुणे पोलीस ताब्यात घेतील अशी शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान,  सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. त्याच प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना सातारा जिल्हा न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता सदावर्तेंच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यानंतर सदावर्तेंना आता पुणे पोलीसही ताब्यात घेणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading