Pune – महिलांसाठी दररोज बस सेवा मोफत देण्याची आम आदमी पार्टीची मागणी

पुणे : काल पीएमपीएल प्रशासनाने महिलांसाठी दर महिन्यात ८ तारखेला तेजस्विनी बसमध्ये मोफत व सेवा जाहीर केली. आम आदमी पार्टी या निर्णयाचे स्वागत करत आहे. परंतु हीच योजना यापूर्वीही २०१८ ला जाहीर करण्यात आली होती हे विसरून चालणार नाही. त्याच प्रमाणे ही सुविधा फक्त या तेजस्विनी प्रकारच्या बसेस मध्ये दिली जाणार आहे, या मध्ये २१०० पैकी फक्त ३० बस गाड्या ह्या तेजस्विनी प्रकारात आहेत आणि त्याही अवघ्या १० मार्गावर धावत असतात. त्यामुळे याचा फार कमी महिलांना लाभ मिळणार आहे. प्रशासनाला जर हे करायचं होत तर ही बस सेवा संपूर्ण बसेसमध्ये आणि आणि कायमस्वरूपी करायला हवी होती.

तसं करता येणे शक्य आहे हे आम आदमी पक्षाने मागील महिन्यात पीएमपीएल फाईल या उपक्रमांतर्गत घेतलेल्या कार्यक्रमात सप्रमाण सिद्ध केले होत. असं असतानाही केवळ आपण काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी किंवा कुणाच्यातरी राजकीय फायद्यासाठी अशी सेवा तात्पुरती आणि अपुरी चालू करणे योग्य नाही. तरीही आगामी काळात प्रशासन आम आदमी पक्षाच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देईल आणि सर्व महिलांसाठी सदर बस सेवा मोफत उपलब्ध करून देईल अशी आशा करायला हरकत नाही.

आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने दिल्लीमध्ये महिलांसाठी मोफत बस सेवा सुरू केल्यानंतरही तेथील बस सेवा सुमारे सव्वा दोन कोटी रुपये फायद्या मध्ये आहे. पुण्यामध्ये हे घडू शकते त्यासाठी खरी गरज आहे ती व्यावसायिक पद्धतीने पीएमपीएल चा गाडा हाकणे. आज तागायत पीएमपीएल ठेकेदारांना, इतर मालपुरवठा करणाऱ्यांना आणि राजकारण्यांना पैसा मिळवून देणारी दुभती गाय असं तिच्याकडे पाहिले गेले. जर व्यवसायिक पद्धतीने ही सेवा चालवली तर बस सेवा फायद्यात तर येईलच परंतु शहरातील सर्व महिलांना मोफत बससेवा देखील देता येणे शक्य आहे. आम आदमी पक्ष पुण्यात सत्ते मध्ये आल्यानंतर किंवा आला नाही तरीही या विषयाचा पाठपुरावा करून महिलांना ना मोफत बस सेवा देण्यासाठी कायम प्रयत्नशील राहील.

आप पुणे कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्यातर्फे आयोजित आजच्या पत्रकार परिषदेला मंजुषा नयन, जयश्री डिंबळे, ज्योती ताकवले, आरती करंजवणे, वैशाली डोंगरे, माधुरी गायकवाड, सेंथिल अय्यर, सुदर्शन जगदाळे यांनी संबोधित करुन वरील मागणी केली.

Leave a Reply

%d bloggers like this: