माजी गृहमंत्री अनिल देशमुख सीबीआयच्या ताब्यात

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने 100 कोटी रुपये वसुली आरोप प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अनिल देशमुख यांचा सोमवारी सीबीआय ताब्यात येणार होती. मात्र देशमुख जे जे रुग्णालयात भरती असल्याने तीन दिवस त्यांचा ताबा लांबणीवर पडला होता. मात्र त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर सीबीआयने अनिल देशमुख यांना आर्थर रोड जेलमधून सीबीआयने ताब्यात घेतले.

या प्रकरणात यापूर्वी सीबीआयने सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना अटक करत 11 एप्रिलपर्यंत सीबीआयच्या कोठडीत न्यायालयाने रवानगी केली आहे.  दरम्यान, 100 कोटी रुपये वसुली प्रकरणात 21 एप्रिल रोजी, देशमुखांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुखांना अटक केली. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत. 

Leave a Reply

%d bloggers like this: