कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी जनजागृती मोहीम

पुणे : कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी जनजागृती मोहीम आखण्यात आली असल्याची माहिती फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ( पुणे चॅप्टर )च्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली . ७ एप्रिल या आरोग्य दिनाच्या निमित्ताने पुरुष नसबंदी शिबीर आयोजित करण्यात येत असून त्यासाठी विनामूल्य नावनोंदणी करावी ,असे आवाहनही करण्यात आले .
असोसिएशनच्या पुणे शाखेच्या अध्यक्ष अॅड. अवलोकिता माने,पुणे ब्रँच मॅनेजर प्रवीण सोनवणे, प्रकल्प समन्वयक श्रीकांत सातर्ले हे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते .

7 एप्रिल 2022 जागतिक आरोग्य दिनानिमित्त नावाजलेले नसबंदी शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ.आर.सी.एम.काझा व डॉ. बलजीत कौर हे पुण्यात नसबंदी शिबिरासाठी येत आहेत. 7 मिनिट वेळेची ही शस्त्रक्रिया असून अर्धा तास आराम केला कि आपण दैनंदिन कामे करू शकतो. पुरुष नसबंदी केलेल्या व्यक्तीस संस्थेकडून रुपये 5000 व सरकारी अनुदान 1100 तर पुरुष नसबंदी साठी तयार केलेल्या दूत व्यक्तीस संस्थेकडून रुपये 1000 तर सरकारी अनुदान 200 देण्यात येणार आहे.
सकाळी 10 ते 3 ही या शिबिराची वेळ असून आधारकार्ड ची प्रत, बँक पासबुक च्या पहिल्या पानाची प्रत घेऊन यावे ,असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क श्रीकांत सातर्ले 8888386886 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन , २o२, वेस्टर्न कोर्ट, १०८२ / अ गणेशखिंड, ( ई स्क्वेअर थिएटरसमोर ) पुणे -१६ येथे संपर्क साधता येईल.

स्त्रियांच्या कुटुंब नियोजन शस्त्र क्रियेपेक्षा पुरुषांची नसबंदी शस्त्रक्रिया सोपी आहे . लग्न करून घरात येणारी पत्नी घर सांभाळण्यापासून संततीला जन्म देणे ,संगोपन ,घरकामाच्या अनेक जबाबदाऱ्या सांभाळत असते . म्हणून कुटुंब नियोजनाची जबाबदारीही तिच्यावर टाकण्यापेक्षा पुरुषांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे ,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले .

Leave a Reply

%d bloggers like this: