fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

Pune crime News : अल्पवयीन मुलीचा बस कंडक्टर कडून विनयभंग

पुणे : पुणे शहरात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आजही आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बस प्रवास करताना एका अल्पवयीन मुलीचा बस कंडक्टरने जाणीवपूर्वक कमरेला हात लावून विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी येथे राहणाऱ्या १७ वर्षाच्या मुलीने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून बस कंडक्टर प्रशांत किसन गोडगे (30,रा. कात्रज – कोंढवा रस्ता) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हा प्रकार स्वारगेट ते विश्रांतवाडी या बस प्रवासात वेस्टएंड चित्रपटगृह ते विश्रांतवाडी प्रवासादरम्यान शनिवारी सकाळी साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. फिर्यादी 17 वर्षीय मुलगी ही स्वारगेट ते पुणे बसने प्रवास करत होती. बस वेस्टएंड थिएटर येथे आली असता कंडक्‍टर प्रशांत तिला जाणीवपूर्वक खेटून उभा राहिला. यावेळी तीने तुला उभे रहायला जागा नाही का? असे विचारले.

तिकीट चेकर गाडीतमध्ये आले असताना तिने त्यांच्याकडे कंडक्टरची तक्रार केली असता त्याचा राग मनात धरुन प्रशांत गोडगे याने फिर्यादीकडे डोळे वटारुन पाहून त्यांच्या कमरेला मुद्दाम तीन वेळा तिच्या कमरेला हात लावून त्यांचा विनयभंग केला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी कंडक्टरला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading