fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsLIFESTYLE

गुढी वस्त्रासाठी पैठणीला पसंती

युवा उद्योजिका ऋजुता गोखले यांनी केली गुढीसाठी विशेष साडीची निर्मिती

पुणे : मराठी नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे दारापुढे उभारली जाणारी गुढी. या गुढीसाठी घराघरात नवीन आणि आकर्षक वस्र वापरण्याचा प्रयत्न केला जातो. नागरिकांची हीच आवड लक्षात घेत पुण्यातील ऋजुता गोखले या तरूण उद्योजिकेने गुढीसाठी साडीची निर्मिती केली आहे. त्यांनी तयार केलेल्या या साडीला जगभरातून मागणी मिळत असून या साड्या पैठणीच्या ताग्यातून शिवण्यात आल्या आहेत.

पुण्यातील ऋजुता गोखले या पैठणी वस्त्र आणि इतर साहित्याची निर्मिती करतात. यंदा गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्राची खासियत असलेल्या पैठणी साडीची थीम वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि साडी शिवण्याचे काम सुरू झाले. या पैठणी साडीमध्ये काठपदर, मोर व इतर नक्षीकाम यांसारख्या डिझाइन वापरून खास गुढीसाठी साडी तयार करण्यात आली आहे. सहावार साडी याचबरोबर पताका या प्रकारात हे वस्त्र शिवण्यात आल्या असून त्यांना जगभरातून मागणी मिळते आहे. ऋजुता यांनी आतापर्यंत दुबई येथे २००, ऑस्ट्रेलिया येथे १७०, अमेरिका येथे १८५ आणि भारतातील विविध राज्यांतील ४७० मराठी बांधवांपर्यंत या साड्या पोहोचवल्या आहेत. गुढीसाठी साडी ही कल्पना सध्या आकर्षक ठरत असून देशातील विविध भागांतून या साडीला मागणी वाढली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading