fbpx

Pune Metro – पहिल्याच दिवशी 22 हजार पुणेकरांचा मेट्रोतून प्रवास

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झाला आहे. त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल 22 हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला आहे. यामध्ये मोबाईल तिकीट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या. त्यानंतर रात्री दहा पर्यंत या फेर्‍या सुरू होत्या.

उद्घाटनानंतर नंतर काही तासात वनाज ते गरवारे या मार्गावर 15842 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर 4616 नागरिकांनी प्रवास केला आहे. रविवारी एकूण 22437 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. यामध्ये 1979 प्रवाशांनी मोबाईलवरुन तिकीट काढले तर बाकीच्यांनी काऊंटरवरुन तिकीट खरेदी केले असल्याची माहिती आहे.

सकाळी आठ ते रात्री नऊ पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे. पुण्यात वनाझ ते रामवाडी दरम्यान पाच मेट्रो स्टेशनचे उद्घाटन झाले. मेट्रोने प्रवास करताना पहिल्या तीन स्टेशनसाठी दहा रुपये मोजावे लागतील तर पुढच्या दोन स्टेशनपर्यंत देखील प्रवास करायचा असेल तर आणखी दहा रुपये मोजावे लागतील. म्हणजे वनाझच्या पहिल्या स्टेशनपासून गरवारेच्या पाचव्या स्टेशनपर्यंत प्रवास करण्यासाठी वीस रुपये मोजावे लागतील.

Leave a Reply

%d bloggers like this: