मानसिक आजारांच्या उपचारांसाठी औंधमध्ये आरंभ मेंटल हेल्‍थ क्‍लिनीकची सुरुवात 

पुणे : धकाधकीच्‍या जीवनशैलीमुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. शाळकरी मुलांपासून ते  ज्‍येष्ठांपर्यंत वेगवेगळ्या मानसिक आरोग्‍यविषयक समस्‍या उद्भवत आहेत .शारीरिक आजारांबरोबरच  मानसिक आजार हि एक गंभीर समस्या असून त्यातून उद्भवणाऱ्या समस्या ह्या योग्य उपचारपद्धतीने कमी होऊ शकतात . बहुस्‍तरीय दृष्टीकोनातून (मल्‍टीडिसीप्‍लीनरी ॲपरोच) ठेवतांना, प्रभावी उपचार उपलब्‍ध करुन देण्यासाठी  रुग्‍ण सल्‍ला व समुपदेशनासाठी औंध येथील डीमार्टसमोरील वेस्‍टएंड शॉपिंग कॉम्‍प्‍लेक्‍स येथील आरंभ मेंटल हेल्‍थ क्‍लिनीक सुरु करण्यात आले आहे .
या सेंटरच्‍या माध्यमातून मानसिक आजारांचे निदान करतांना त्‍यांचे योग्‍य व्‍यवस्‍थापनाद्वारे यशस्‍वीरीत्‍या मात करता येऊ शकते.या क्‍लिनीचे  उदघाटन प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ,लेखक व समाज सुधारक डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले तसेच याप्रसंगी  डॉ.  शरद पाटील , आरंभ मेंटल हेल्थ क्लिनिक चे मानसोपचार तज्ञ डॉ. ऋत्विक चटर्जी व सहसंस्थापिका मानसोपचार तज्ञ डॉ. देविका पाटील उपस्थित होते .
आरंभ मेंटल हेल्‍थ क्‍लिनीकचे संस्‍थापक मानसोपचार तज्‍ज्ञ डॉ.ऋत्‍विक चटर्जी म्हणाले की  मानसिक समस्‍यांमध्ये तसेच मानसिक रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, लक्षणांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते.यामुळे नैराश्य , निद्रानाश यांसारख्या घटना उभवू शकतात .  आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या समस्या आम्ही नीट पद्धतशीरपणे समजून घेतो  तसेच त्यांना योग्य मार्गदर्शनातून  त्यांना योग्य अशा उपचारपद्धती व औषधोपचाराचा सल्‍ला देतो.

आरंभ मेंटल हेल्‍थ क्‍लिनीकच्या सहसंस्थापिका  डॉ.देविका पाटील म्‍हणाल्‍या की मानसिक समस्‍यांचे स्‍वरुप वेगवेगळे असते. मुड डिसऑर्डर्स-तणाव, बायपोलर डिसऑर्डर, अँनझायटी डिसऑर्डर व फोबियाज्‌, डीॲडीक्‍शन, स्‍कीझोफ्रेनिया व अन्‍य मानसिक आजार, वैक्‍तिमत्त्वाशी निगडीत मानसिक समस्‍या, तणाव व्‍यवस्‍थापन, लहान मुलांच्‍या मानसिक आरोग्‍याशी निगडीत समस्‍या, यात प्रामुख्याने अध्ययनात येणार्या समस्‍या, स्‍वमग्‍नता, कॉग्‍नेटीव्‍ह बिहेव्‍हीयरल थेरपी (सीबीटी), आरईबीटी, फॅमेली थेरपी, कपल्‍स थेरेपी अशा आरोग्‍य सुविधा आरंभ मेंटर हेल्‍थ क्‍लिनीकच्‍या माध्यमातून उपलब्‍ध झालेल्‍या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: