fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

शेकाप पुणे महापालिकेच्या निवडणूकित ११० जागा लढवणार

पुणे :अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या पुणे महापालिका निवडणुकीकडे साऱ्या राजकीय पक्षाचे लक्ष लागून आहे. एककिडे सत्ताधारी भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील भाजपला चितपट करणार असल्याचे सांगितले  आहे. आता या निवणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने देखील तयारी सुरू केली आहे. शेकाप येणाऱ्या पुणे महापालिकेच्या निवडणूकित ११० जागा लढवणार असल्याची माहिती आज शेतकरी कामगार पक्षाचे, पुणे शहर अध्यक्ष सागर अल्हाट यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला  शेकापचे चंद्रशेखर नलावडे पाटील, दीपक पाटील, अतुल पिसाळ उपस्थित होते. सागर अल्हाट म्हणाले, आम्ही राज्यातील एका जबाबदार पक्ष म्हणून निवडणूक लढवण्याबाबत अतिशय संवेदनशील आहोत. आमच्या पक्षाची ताकद जरी कमी वाटत असली तरी आमचा विश्वास या सर्व प्रस्थापित पक्षांपेक्षा मोठा आहे. आम्ही धनशक्तीला कधीच महत्त्व दिलं नाही. तर जनशक्ती ला महत्व दिलं.  लोकांच्या समस्यांचे आम्हाला जाण असल्याने. आम्हीं सामान्य पुणेकरांचा आवाज बनू शकतो. ही निवडणूक जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही उद्यापासून शहरात संवाद अभियान सुरू करत आहोत, असे ही सागर अल्हाट यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading