fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पुणे महानगरपालिका निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली लढु -चंद्रकांत पाटील

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे. त्यावर महापालिकेसाठी आम्हाला मोदींची गरज नाही, आम्हाला बापट पुरेसे आहेत. पुणे महानगरपालिका निवडणूक खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली लढु,
असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

पाटील म्हणाले, पुणे महापालिकेत असलेल्या भाजपाच्या सत्तेमुळेच ११ हजार कोटींचा मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. त्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पाहाणी दौरे, उद्घाटने करण्यात व्यस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता असताना ५० वर्षांच्या काळात काय केलं हे जनतेसमोर मांडावं, आम्ही ५ वर्षांचा हिशेब मांडू.

पुढे बोलताना ते म्हणाले, गेल्या पाच वर्षांत महापालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून पुणे शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने ‘हम करे सो कायदा तत्वाने जुन्या प्रभागांची मोडतोड करत, नवी प्रभाग रचना केली. पण तरीही महापालिकेत भारतीय जनता पक्षाचीच सत्ता येईल, असा दावा त्यांनी केला. महापालिकेत राष्ट्रवादीचे 100 नगरसेवक हे सर्व पक्षांचे मिळून आहेत. त्यांनी अशासकीय पद्धतीने प्रभागरचना केली आहे. 23 गावं ऐन निवडणुकीच्या तोंडावर समाविष्ट केली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

संजय राऊतांना सल्ला देण्याचे धाडस परमेश्वरही करणार नाही

तेलंगाणा मुख्यमंत्र्यांच्या भेटविषयी ते म्हणाले, 2019 साली सुद्धा अशाच वलग्ना झाल्या होत्या. मतमोजणीसाठी सर्वजण सुटा बुटात आले होते. पण काय झालं ते सर्वांना दिसलं आहेच. मी कधीही संजय राऊत यांना सल्ला दिलेला नाही, त्यांना सल्ला देण्याचा धाडस परमेश्वरही करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मी भारी पडणारा पाटील आहे

राजकीय भाषा खालावली आहेत याबाबत पाटील म्हणाले, भाषा खालावली आहे हे मान्य आहे, मात्र संजय राऊतांना ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत मी बोलतो. मी कोल्हापूर जिल्ह्यातील भारी पडणारा पाटील आहे. पण ती भाषा वापरण्याची माझी संस्कृती नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading