fbpx
Saturday, April 20, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

‘कोरेगाव भिमा लढाईचे वास्तव’ पुस्तकाच्या लेखकांचा विवेक बनसोडे यांनी केला पर्दाफाश

पुणे : १ जानेवारी २०१८ कोरेगाव भिमा लढाईचे वास्तव है पुस्तक प्रकाशित झाल्याने दलित समाजकडून त्याचा निषेध केला जातोय आज रिपब्लिकन विद्यार्थी सेना प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी हे पुस्तक माळवदकर यांनी नसून सौरभ विरकर या उजव्या विचारसणीच्या इसमानी लिहलय याचे पुरावे म्हणून https://www.inmarathi.com/110722/bhima-koregaon-war-and-ambedkar/amp/ या पेजवर ४ जानेवारी २०२१ ला जो लेख प्रसिध्द केला त्यात लेखकाचे नाव सौरभ विरकर या नावानी प्रसिध्द केला गेला आहे. 

पुस्तकातील लिखाण सौरभ विरकर यांचे लिखाण संदर्भ तंतोतंत जुळत असून अँड रोहन माळवदर पुस्तक प्रकाशित वेळी सौरभ विरकर उपस्थित असल्याचे पुरावे बनसोडे यांनी प्रसिध्द केले माळवदकराचे पुस्तक सौरभ विरकर हाच वितरीत करीत असून त्याच्या सौशल मिडीया पेजवर आदरणीय प्रबोधनकारक ठाकरे ,यांच्या पुस्तकावर आदरणीय शरद पवार यांच्या विचारवर आक्षेपार्ह लिखाण ही दिसून येते दोन समाजात तेढ कसा निर्माण होईल या उदेशानाने हि पुस्तिका लिहल्याचा आरोप विवेक बनसोडे यांनी केला मुळात पेशवा आणि इंग्रजामध्ये हे युध्द झाले त्यातील ८३४ सैनिकापैकी आसून बहुसंख्य ५०० महार सैनिक या लढाईत होते आणि ५०० महार सैनिक असलेला उल्लेख् मा १६/०८/२०११ च्या मा.तहसिलदार हवेली यांनी रिपब्लिकन सेनेच्या तक्रारीनुसार नामदेव मळवदकर आणि विवेक बनसोडे यांच्या सुनावणी पत्राकात म्हटले आहे. 

तसेच १ जानेवारी २०१८ रोजीचा कार्यक्रम होऊ नये म्हणून २०१७ साली मा.सत्र न्यायालयात माळवदकर कुंटुबीयाकडून केलेला दावा मा.न्यायालयांने फेटाळत अँड रोहन माळवदकर यांनीच दिलेल्या सनंदी मधे युध्द झाले असून बाजीराव पेशवा हारले आसे नमूद आहे रोहन माळवदकर हा स्तंभ परीसरातील ९ एकर जागा बळकवण्यासाठी हा सर्व प्रकार आहेत माळवदकरांच्या नावानी पुस्तक खपवून पुन्हा दंगल घडवण्याचा सौरभ विरकराचा हेतू होता का .?याचा शोध घेणे गरजेचे आहे कायदा व सुव्यवस्था कायम राहावी जातीवादी शक्तीचे मनसुबे हाणून पाडण्याचे काम दोन्ही समुदयांने करावे आसे आवाहन विवेक बनसोंडे यांनी केले

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading