fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

भारतीय कला क्षेत्रात पं.बिरजू महाराज यांचे नांव अजरामर राहील – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंडित बिरजू महाराज आणि माझे घनिष्ठ संबंध होते. मी काँग्रेसचा शहराध्यक्ष असताना काँग्रेस भवनमध्ये बिरजू महाराजांची कथ्थक नृत्याची कार्यशाळा आयोजित केली होती. त्याप्रसंगी तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी आणि आमदार रमेश बागवे यांनी त्यांचा सत्कार केला होता. पुण्यातील नृत्यप्रेमींनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. पंडित बिरजू महाराज आणि नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्या नृत्याचा कार्यक्रम मी काँग्रेस भवन येथे आयोजित केला होता. माझ्या आग्रहाखातर गणेश कला क्रीडा केंद्र येथे झालेल्या राजस्थान महोत्सवातही पंडित बिरजू महाराज सहभागी झाले. त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहातील. एका महान कलाकाराशी माझे संबंध जुळून आले, त्यांचा सहवास लाभला या आठवणी माझ्या मनात चिरंतन राहातील. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने, नृत्य कलेला जीवन वाहून घेतलेला असामान्य, थोर कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय कला क्षेत्रात पंडित बिरजू महाराज यांचे नाव अजरामर राहील. अशा शब्दात माजी आमदार मोहन जोशी यांनी पं. बिरजू महाराज यांना श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading