fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

केंद्र सरकारच्या फेल झालेल्या उज्वला गॅस सबसिडी योजने विरोधात पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीचे आंदोलन

पुणे : गेली अनेक महीने केंद्र सरकारची उज्वला गॅसची सबसिडी सामान्य नागरिकांना भेटली नाही. त्या विरोधात आज पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीने आंदोलन केले आहे. हे आंदोलन पुण्यात अलका चौक येथे करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी केले.

या आंदोलनाला संगिता तिवारी, उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटी, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे , माजी आमदार मोहन जोशी,पूजा आनंद पुणे शहर काँग्रेस महिला शहराध्यक्षा, सुजाता शेट्टी, शोभना परळीकर, नंदाताई डावरे, ज्योती परदेशी, स्वाती शिंदे, अंजली सोलापुरे, नीता टाळु, ताई कसबे, मंगला चव्हाण, शोभा पाडेकर, बेबीताई राऊत, माया डोरे, सुनिता मेमुर, रमा भोसले, वंदना सातपुते, अंजलीपंखा वाला, अंजली सोलापुरे, रेश्मा राणे उपस्थित होत्या. या आंदोलनाच्या वेळी केंद्र सरकारची उज्वला गॅस सबसिडी योजना फेल झाली म्हणून काँग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.

संध्या सवालाखे म्हणाल्या, या केंद्र सरकारने उज्वला गॅस सबसिडी योजना फेल केली. पेट्रोल, डिझेल, यासारखे दर वाढवले महागाई वाढवली आहे. हे भाजप सरकार सामान्य नागरिकाचा अंत बघत आहे. म्हणून आज आम्ही त्याविरोधात राज्यभर आंदोलन करत आहोत असे संध्या सव्वालाखे म्हणाल्या.

रमेश बागवे म्हणाले, पेट्रोल डिझेल दरवाढ दोन-तीन वर्षापासून केंद्र सरकारने वाढवली आहे. या भाजप सरकारला एकच इशारा आहे. जर त्यांनी उज्वला गॅस सबसिडी योजना सामान्य नागरिकांना दिली नाही तर. आम्ही येथील पुढील काळात मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, असा इशारा रमेश बागवे यांनी दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading