fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांची निवड- उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे:पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे यांना संधी देण्यात आली आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना दिली.

अजित पवार म्हणाले,राज्यातील रस्त्यांबाबत काही महिन्यांपुर्वी नितीन गडकरींच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक पार पडली.  या बैठकीत गडकरींनी स्वच्छ सांगितले की राज्यातील महामार्गांची कामे व्हायची असतील तर जमिनींच्या मोबदल्यासाठी देण्यात येणार्या दरात बदल करावे लागतील.  शेजारच्या कर्नाटक,  मध्य प्रदेश,  गुजरात,  तेलंगणा या राज्यात वेगळा दर आणि आपल्या राज्यात वेगळा दर असे चालणार नाही.  कारण हायवेसाठी पैसै केंद्र सरकार देते.  गडकरींनी स्वच्छ सांगितले होते की अखेरचे सांगतोय रस्ते हवे असतील तर जमिनींच्या मोबदल्यात बदल करावे लागतील.  त्यामुळे हा बदल करण्यात आलाय.असे अजित पवार म्हणाले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बँक, एका विचाराची लोक एकत्र आले आणि निवडून आलेले आहेत. आता बँका चालवणे अवघड झालेले आहे, अनेक नियमावली येत असतात .पारदर्शक काम करा, कागदपत्राची पूर्तता आणि धोरणात बसत असेल तर त्यांना मदत करा .असे पवार म्हणाले.
रिक्षावाले हे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढत आहेत त्यावर अजित पवार म्हणाले,अजित पवार चिडलेत, जमाव बंदीचा आदेश असतानाही गर्दी का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.
राज्यातील नागरिकांच्या जीवाशी खेळणारा मी नाही मी नियमांचे पालन करणारा आहे असे अजित पवार म्हणाले.
गोवा आणि यूपी निवडणूक मध्ये शरद पवार गोवा आणि उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत त्यावर विरोधकांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्यावर अजित पवार म्हणाले,पवार साहेबांची उंची काय आहे, त्यांच्याबद्दल विचार करुन आदर ठेवून बोलायला हवे नवीन पिढीने.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading