fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

वाहतुक पोलीस किंवा वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) लवकरात लवकर नेमा- विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ

पुणे : प्रभाग क्र. ३२ मधील वारजे माळवाडी व माई मंगेशकर हॅस्पिटल भुयारी मार्ग या दोन्ही चौकामध्ये गेले अनेक दिवसांपासुन वाहतुकीची फार मोठी कोंडी होत आहे. दोन पाच मिनंटाच्या अंतरासाठी आर्धा-आर्धा तास थांबावे लागत आहे. दोन्ही चौकामध्ये प्रचंड वाहतुक कोंडीमुळे अग्निशामक वाहन व रुग्णवाहीका जाण्याकरीता देखील अडचण होत. रुग्णवाहीका वेळेवर न पोहचल्यास जिवीतहानी होण्याची दाट शक्यता आहे. याची दाखल घेवून या दोन्ही ठिकाणी वाहतुक पोलीस किंवा वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) लवकरात लवकर नेमण्यात यावेत अशी मागणी  विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

दिपाली धुमाळ यांनी दिलेल्या निवेदना नुसार, या परिसारात ज्येष्ठ नागरिक, महिलांची व लहान मुलांची वाहतुक कोंडीमुळे मोठी कुचबंना होत आहे. नागरिकांना नाहक त्रास करावा लागत आहे. संध्याकाळच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तरी सदर दोन्ही चौकातील वाहतुक कोंडी सोडविण्याकरीता सांय ६ ते ९ या वेळेत वाहतुक किंवा वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) ची अत्यंत आवश्यकता आहे. पोलिसांनी तरी या दोन्ही मुख्य चौकामध्ये आपल्या कार्यालया मार्फत सांय ६ ते ९ या वेळेत किमान दोन वाहतुक पोलीस किंवा दोन वाहतुक नियोजन गार्ड (वॉर्डन) नेमण्यात यावे, जेणे करुन दोन्ही मुख्य चौकात वाहतुक कोंडी होणार नाही तसेच नागरिकांची गैरसोय थांबेल, अशी मागणी विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading