fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

अनाथांची माय हरपली; जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन 

पुणे : अनाथांसाठी आयुष्य वेचलेल्या आणि अनाथांची माय अशी ओळख असलेल्या जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. आज (दि. 4) रात्री 8 वा. 10 मिनिटांनी पुण्यातील गॅलक्सी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. उद्या (दि. 5) सकाळी 9 वा. वैकुंठ संशयंभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, 24 नोव्हेंबर 2021 रोजी सिंधुताई यांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. अन् आज हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading