fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

सावित्रीबाईच्या स्मृतीला सत्यशोधक विचारांच्या लेकींनी सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे केले अभिवादन

पुणे : सावित्री, फातिमाच्या लढयाचे प्रतिबिंब आपल्या संविधानातही उमटले आहेत. त्याचाच परिणाम महिलांनी अधिकार मिळाले आहेत. पण अजूनही स्त्री सक्षम बनवण्यासाठीचा अजून लढा द्यायची गरज आहे असे महाराष्ट्र काँग्रेचे प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड यांनी व्यक्त केल्या. निमित्त होते सावित्री बाईंच्या 191 व्या जयंती निमित्त ती लढली आम्ही घडलो या सांस्कृतिक कार्यक्रमाचे.

कार्यक्रमाची सुरवात महात्मा फुले व सावित्री बाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला. सावित्री बाई फुले यांच्या विचारांना स्व:ताच्या आयुष्यात उतरवणाऱ्या लेकींनी हा कार्यक्रम सादर केला. यात वस्तीत व सर्वसामान्य घरात राहूनही पत्रकारिता, वाणिज्य शाखा, समाजशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या मंगल निकम, वर्षा सपकाळ, गीता अंजली, नीलिमा घरत, राजश्री भोसले, रिना, अंगणवाडीच्या राजश्री कालेकर यांचा समावेश होता. तसेच फुले दांपत्यानी सुरू केलेल्या 18 शाळांच्या धुळपाट्या व त्यांच्या समोर प्रकाशमान ज्ञानज्योती ठेवली ज्याने कार्यक्रमाचा मंच जीवंत झाला.

लढण महीलांसाठी नवीन नाही, ती लढत आली आहे व पुढेही लढत राहिल. महिला जेव्हा संघटित होऊन लढतात त्या फक्त स्व:यासाठी लढत नसून त्या निसर्ग साठी, समाजासाठी, संविधनासाठी आणि आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी लढतात हेच आम्ही सावित्री फातिमा बी कडून शिकलो आहे असे परखड मत अलका जोशी यांनी मांडले. त्या पुढे म्हणाल्या की शाहीनबाग व शेतकरी आंदोलनामध्ये बनलेली भूमिका दिलेला लढा हे याचेच द्योतक आहेत.

या वेळी न्या. बी.जी कोळसे पाटील, मोहन जोशी, पुजा आनंद, सुनंदा साळवी, प्राची दुधाने, अर्चना शहाही उपस्थित होते. अभिव्यक्ती, पुणे शहर महिला कॉंग्रेस, अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र), स्वाधार महिला पंचायत, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समिती, वारसा सोशल फाऊंडेशन, मैत्रिण महिला मंच अशा विविध संस्था संघटनांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading