fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना भारतरत्न द्यावा – एम. डी.शेवाळे

पुणे : १८ ऑक्टोबर १९०६ रोजी महर्षी शिंदे यांनी ”डिप्रेस्ड क्लास मिशन” या संस्थेची स्थापना केली. अस्पृश्य उद्धाराच्या कार्यासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी १८ ऑक्टोबर १९०६ रोजी डिस्प्रेड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळी या संस्थेची स्थापना करून देशातील उपेक्षित ,डलित,वंचित घटकांना शिक्षणाची दारे खुली केली,त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून महर्षी शिंदे यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न द्यावा तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी यांना भेटून याबाबत मागणी करणार असल्याचे डी.सी.एम.सोसायटीचे सचिव ,तसेच रिपबलिकन पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार एम.डी.शेवाळे यांनी अभिवादन सभेत जाहीर केले.

नाना पेठ येथील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यांनतर महर्षी विठ्ठल शिंदे यांनी स्थापन केलेल्या संस्थेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी शेवाळे यांनी आपला संकलप व्यक्त केला.यावेळी महर्षी शिंदे यांचे चरित्र व फोटो वाटप करण्यात आले.
यावेळी संस्थेचे खजिनदार विशाल शेवाळे म्हणाले की ,महर्षी शिंदे यांचा विचार आणि कार्य पुढे नेण्याची गरज आहे .हा पुण्यतिथी कार्यक्रम ही अतिशय ऐतिहासिक जागेत होत आहे ज्या संस्थेची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनीच केली होती . डी .सी .एम . संस्थेचे

डॉ . बाबासाहेव आंबेडकर कॉलेज , नाना पेठ पुणे , महात्मा फुले हायस्कूल , मुलींचे , महात्मा फुले , हायस्कूल , मुलांचे नाना पेठ , पुणे , डी .सी . मिशन प्राथमिक शाळा , ८९६ , नाना पेठ ( अहिल्याश्रम ), पुणे वतीने आज २ जानेवारी २०२२ रोजी महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक , डिप्रेस्ड क्सास मिशनचे संस्थापक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले , यावेळी संस्थेचे अध्यक्ष रजपूत डी .टी . संस्थेचे जनरल सेक्रेटरी एम .डी . शेवाळेसाहेब , खजिनदार विशाल भाऊ शेवाळे साहेब , काजलताई शेवाळे मॅडम , मुलींचा शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पाताई भोसले मॅडम , मुलाचा शाळेच्या भोसरे कर मॅडम , आदमबागच्या नगरकर मॅडम , इभाडसर ., मदने मॅडम , कॉलेजचे , म्हस्के सर , उपस्थित होते . यावेळी . संस्थेच्या पदाधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading