fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

२३ गावांनी न्याय मात्र ११ गावांवर अन्याय अन्यायकारक मिळकतकरा विरोधात हवेली कृती समीतीचे जन आंदोलन

पुणे:सात महिन्यापुर्वी नव्याने समाविष्ट झालेल्या
२३ गावांत मिळकतकरात नागरिकांना न्याय देण्यात आला मात्र २०१७ मध्ये समावेश केलेल्या ११ गावांत भरमसाठ कर आकारणी करून अन्याय करण्यात आला आहे. अन्यायकारक कर रद्द न केल्यास तीव्र जन आंदोलन सुरू करण्याचा इशारा हवेली तालुका कृती समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील यांनी दिला आहे.

धायरी ,शिवणे ,उत्तमनगर, आंबेगाव आदी ११ गावातील हजारो नागरिकांवर अन्यायकारक मिळकतकरामुळे मोठे संकट कोसळले आहे. अनेकांवर मालमत्ता विकण्याची वेळ आली आहे. कोरोना संसर्गापासून बहुतांश घरे, सदनिका सोडून भाडेकरू गेले आहेत.दुकाने बंद आहेत. असे असताना पालीकेने आकारलेला सुलतानी मिळकतकर कसा भरावा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हवेली तालुका नागरि कृती समीतीचे अध्यक्ष श्रीरंग चव्हाण पाटील म्हणाले , समीती तसेच ११ गावातील नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी अन्यायकारक मिळकत कर कमी करण्यासाठी वेळोवेळी विनंत्या केल्या आहेत. मात्र कर कमी करण्यात आला नाही.
२३ गावच्या ग्रामपंचायतीत नोंद असलेल्या मिळकतींची करपात्र रक्कम ‘ज्या सालचे घर, त्या सालचा कर’ या धोरणानुसारच लागू होणार आहे.
मात्र ११ गावातील मिळकतकरात अन्यायकारक पणे तीन ते चार पट वाढ करण्यात आली आहे. शेड ,राहत्या घरानां तब्बल वीस ते तीस लाख रुपये मिळकत आकारणी केली आहे. त्यामुळे शेड ,घरे मालमत्ता विकण्याची वेळ येथील रहिवाशांवर आली
आहे.

चव्हाण पाटील म्हणाले ,ग्रामपंचायतींच्या नमुना ८ रजिस्टरमध्ये नोंद असलेल्या मिळकतींचे ग्रामपंचायत आकारत असलेल्या दरात पालीकेने अनेक पट वाढ केली आहे. शहराच्या मध्यवस्तीतील दर व्यावसायिक मिळकतीना आकरले आहेत. अनेक शेड, दुकाने ,घरे बंद आहेत. मात्र कर आकारणी अनेक पट केली आहे. भरमसाठ कर भरण्यासाठी पैसेही नाहीत.
या आधी १९९७ मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या उर्वरित धायरी, वडगाव सिंहगडरोड परिसरातील मिळकत करां पेक्षा २०१७ मध्ये समावेश केलेल्या परिसरात चार ते पाच पट अधिक कर आकारणी करण्यात आली आहे. करात पन्नास ते साठ टक्के सवलत देण्यात यावी .अशी मागणी चव्हाण पाटील केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading