fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

डाबरचा ‘डाबर विटा’ सह हेल्थ फूड ड्रिंक श्रेणीत प्रवेश

पुणे : डाबर इंडिया लिमिटेड या भारतातील आयुर्वेदिक आणि नॅचरल हेल्थकेयर कंपनीने आज ‘डाबर विटा’ लाँच करून हेल्थ फूड ड्रिंक श्रेणीमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली.डाबरचे हे नवीन डाबर विटा हेल्थ ड्रिंक अश्वगंधा, गिलोय आणि ब्राह्मी यांसारख्या ३० औषधी वनस्पतींपासून बनवले जाते. या औषधी वनस्पती केवळ शरीराची प्रतिकारशक्ती (रोगांशी लढण्याची शक्ती) वाढवत नाहीत तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासातही मदत करतात.

स्मर्थ खन्ना, बिजनेस हेड, ई-कॉमर्स, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले.डाबरची गुणवत्ता, विश्वास आणि १३७ वर्षांच्या अनुभवाने तयार केलेले, डाबर विटा हे पेय दुधाच्या खाद्य पेय श्रेणीतील सर्वात स्वादिष्ट पेयांपैकी एक आहे आणि आणि हे प्रतिकारशक्ती देखील दुप्पट करते .ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या मिल्क ड्रिंक्सच्या झपाट्याने वाढणाऱ्या मागणीमुळे, आम्हाला विश्वास आहे की डाबर विटा सह, आम्ही ग्राहकांच्या या वाढत्या गरजा पूर्ण करू शकू. आम्हाला आनंद आहे की आम्ही हे नवीन उत्पादन आमच्या स्वतःच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टसह भारतात लॉन्च करणार आहोत. या लॉन्चमुळे, आम्ही दोन्ही ब्रँड मोठ्या प्रमाणावर ग्राहकांपर्यंत पोहोचू शकू. आरोग्य श्रेणीतील आमचा पोर्टफोलिओ डाबर व्हिटा सह आणखी मजबूत झाला आहे, ज्यामुळे आमच्या ग्राहकांना आरोग्य उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचा आनंद घेता येईल. “

प्रशांत अग्रवाल, मार्केटिंग हेड – हेल्थ सप्लिमेंट्स, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले. अलिकडेच नीलसने केलेल्या अध्ययनानुसार, सुमारे ८८ टक्के माता त्यांच्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी चांगल्या आरोग्यदायी पेयाची अपेक्षा करतात. कोविड नंतरच्या काळात ग्राहकांच्या या गरजा लक्षात घेऊन आम्ही हे अनोखे उत्पादन घेऊन आलो आहोत, जे बाजारात उपलब्ध असलेल्या इतर हेल्थ ड्रिंक्सपेक्षा कितीतरी जास्त पटीने प्रतिकारशक्ती प्रदान करते. डाबर विटा हे आयुर्वेदाच्या फायद्यांसह चवीने चॉकलेटी देखील आहे, ज्यामुळे मुलांना हे पेय नक्कीच आवडेल. त्यात असलेले आयुर्वेदिक बूस्टर टीएनएफ अल्फाची क्रिया वाढवून प्रतिकारशक्ती वाढवतात, म्हणून डाबर विटाला भारतातील सर्वोत्तम रोग प्रतिकारशक्ती तज्ञ म्हणता येईल. डाबर ने डाबर वीटाच्या ई-कॉमर्स लाँचसाठी फ्लिपकार्ट सोबत भागीदारी केली आहे. हे चॉकलेटी फ्लेवर ७ प्रकारच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading