fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत आरीव कामत, आदित्य कानडे,शुभांकर बर्वे आघाडीवर  

पुणे : पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी)यांच्या वतीने आयोजित ट्रूस्पेस पुणे जिल्हा खुल्या निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेत पहिल्या फेरीअखेर 7 वर्षाखालील मुलांच्या गटात आरीव कामत, आदित्य कानडे,शुभांकर बर्वे यांनी तर, मुलींच्या गटात अवनी मावुनगल, मिहिका बोळे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 
 
मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात आरीव कामतने निवान अगरवालचा, तर आदित्य कानडेने आसवा विधानचा पराभव करून 1गुण मिळवला. 11वर्षाखालील मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीअखेर निहीरा कौल, तहस्वी वर्तक, आभ्या कुलकर्णी, ओवी पावडे यांनी 2 गुणांसह आघाडी मिळवली. 
 
स्पर्धेचे उदघाटन ट्रूस्पेसचे व्यवस्थापकीय संचालक व पीडीसीसीचे उपाध्यक्ष आश्विन त्रिमल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बुद्धिबळ क्रीडा ट्रस्टचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, आयएम अभिषेक केळकर, चीफ आरबीटर विनिता  श्रोत्री, रशीद इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 7 वर्षाखालील मुले:व्हाईट व ब्लॅक नुसार: पहिली फेरी:
आरीव कामत(1गुण) वि.वि.निवान अगरवाल(0गुण);
आसवा विधान(0गुण) पराभूत वि.आदित्य कानडे(1गुण);
आजमानी करमवीर(0गुण) पराभूत वि.शुभांकर बर्वे(1गुण);
रियान भोसले(0.5गुण)बरोबरी वि.राजुल कुराडे(0.5गुण);
राजवीर माळी(1गुण) वि.वि.रुद्र दामोदरे(0गुण);
 
 7वर्षाखालील मुली: पहिली फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार: 
अवनी मावुनगल(1गुण) वि.वि.आर्ना बेलानी(0गुण);
मिहिका बोळे(1गुण) वि.वि.ओवी संकला(0गुण);
स्वरा चन्नागिरी(1गुण)  वि.वि.आराध्या पुरंदरे(0गुण);
तिया रॉय(0गुण) पराभूत वि.शुभश्री ढेकणे(1गुण);
 
11 वर्षाखालील मुले: पहिली फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार: 
आयुष कुलकर्णी(0गुण) पराभूत वि.प्रथमेश शेरला(1गुण);
विरेश शरणार्थी(1गुण)वि.वि.शुभम घनवट(0गुण);
मकरंद नावरे(0गुण) पराभूत वि.आर्यन राव(1गुण);
कुशाग्र जैन(0गुण) पराभूत वि. श्लोक मलिक(1गुण);
 
11वर्षाखालील मुली: दुसरी फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार: 
प्रतिती खंडेलवाल(1.5गुण) बरोबरी वि.साई पाटील(1.5गुण);
श्रेया ठाकूर(1गुण) पराभूत वि.निहीरा कौल(2गुण);
तहस्वी वर्तक(2गुण) वि.वि.आरोही भोगले(1गुण);
आभ्या कुलकर्णी(2गुण) वि.वि.आयुषा सिंग(1गुण);
तन्मयी आवटे(1गुण) पराभूत वि.ओवी पावडे(2गुण);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading