fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

वरिष्ठ गट राज्यस्तरीय सॉफ्टबॉल : पुणे अ, पुणे ब, संगमनेर, जळगाव संघाची विजयी सलामी 

पुणे : पुणे अ, पुणे ब, संगमनेर, जळगाव संघांनी आइज् सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने आयोजित केलेल्या १४ व्या वरिष्ठ गटाच्या सॉफ्टबॉल राज्यस्तर स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्घाटन आयकर विभागाचे उपआयुक्त संजीवकुमार वर्मा, रमणबाग प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील शिवले व राष्ट्रीय खेळाडू योगेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारार्थी दत्ता मोरे, पूनावाला ग्रुपचे संचालक नरेंद्र पाटील, आयकर निरीक्षक नागेश पालकर, आइज सॉफ्टबॉल अकादमीचे सचिव राजेंद्र मिसाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
 
पुणे अ संघाने अकोला संघाला ५-१ होमरनने पराभूत करताना विजयी सलामी दिली. पुणे अ संघाकडून तन्मय वैद्य, सुहृद डोळे, गौरव राजपुरे, क्षितीज फडकर व शार्दुल कडेकर यांनी प्रत्येकी १ होमरन केला. अकोला संघाकडून शृतम मिश्रा याने १ होमरन केला. ओम सोलंकी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
संगमनेर संघाने नाशिक संघाला १-० होमरनने पराभूत केले. संगमनेर संघाकडून वैभव मुठे याने १ होमरन केला. नाशिक संघाला होमरन करण्यात अपयश आले. पवन गुंजाळ याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
पुणे ब संघाने यवतमाळ संघाला ५-० होमरनने पराभूत केले. पुणे ब संघाकडून हृत्त्विक फाटे याने २ तर गणेश भराटे, शुभम काटकर, स्वप्नील गदादे, यांनी प्रत्येकी १ होमरन केला.
जळगाव संघाने पुणे अ संघाला १६-० होमरनने पराभूत करताना स्पर्धेतील सर्वात मोठा विजय नोंदविला. जळगाव संघाकडून धीरज बावीस्कर व जयेश मोरे यांनी प्रत्येकी ३, प्रीतीश पाटील, सागर पाटील, सुमेध तळवेलकर, कल्पेश कोल्हे यांनी प्रत्येकी २ तर, गौरव चौधरी व कुणाल सपके यांनी प्रत्येकी १ होमरन केले. पुणे अ संघाला होमरन करण्यात अपयश आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading