fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSports

आइज्(AAY’S) सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने राज्य स्पर्धेचे आयोजन 

पुणे  : आइज् सॉफ्टबॉल अकादमीच्या वतीने १४ व्या एएसएल राज्य स्पर्धेचे आयोजन ११ व १२ डिसेंबर रोजी स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर  करण्यात आले आहे, अशी माहिती आइज् सॉफ्टबॉल अकादमीचे सचिव राजेंद्र मिसाळ यांनी दिली.
या स्पर्धेत पुणे अ, पुणे ब, संगमनेर, नाशिक, यवतमाळ, जळगाव, अकोला व नवी मुंबई असे आठ संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे उ्दघाटन ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता क्रीडा व युवक सेवा संचालनालयचे आयुक्त ओमप्रकाश बखोरिया, पूनावाला ग्रुपचे संचालक नरेंद्र पाटील, सार्थक कॉर्पोरेशनचे सुनील चव्हाण, आयकर अधिकारी नागेश पालकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या स्पर्धेत ऋतिक फाटे, जयेश मोरे, कल्पेश कोल्हे, गौरव चौधरी, दानिश दलाल, कल्पेश जाधव, पियूष चांदेकर आदी राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading