fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये एकाच वेळी नवे रिक्षा भाडे दर लागू करा

रिक्षा पंचायतीची परिवहन आयुक्तांकडे मागणी

पुणे : पुणे व  पिंपरी चिंचवड शहरात एकाच वेळी सर्व रिक्षांना भाडे लागू करावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीच्यावतीने  राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे केली. यावेळी रिक्षा पंचायतीच्या शिष्टमंडळाने आपल्या मागणीचे निवेदन परिवहन आयुक्तांना दिले. यावेळी शिष्ट मंडळात आनंद बेलमकर, काशिनाथ शेलार, सोपान घोगरे, प्रशांत कांबळे, विशाल बागुल उपस्थित होते.

रिक्षा मीटरमध्ये नवे भाडे दर बदलण्यासाठी दीर्घ काळ लागणार आहे. तोपर्यंत नव्या भाडे दराचे आपल्या मीटरमध्ये प्रमाणीकरण करून घेणाऱ्या रिक्षांनाच तो लागू होईल असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तो अतार्किक आणि अन्यायकारक आहे. सर्वांना एकाच वेळी भाडे दर लागू करण्यासाठी नुकतेच मुंबईमध्ये नवे भाडे दर लागू केले त्यावेळी रिक्षाभाडे दरतक्ता वापरण्यास परवानगी होती. तसेच रिक्षा भाडेदर तक्ता पुण्यात वापरायला परवानगी द्यावी आणि मोबाईल मध्ये रिक्षा मीटर चे ॲप काही प्रथितयश कंपन्यांनी तयार केले आहे हे ॲप रिक्षा चालक आणि प्रवासी दोघांना आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करण्यास परवानगी द्यावी. या दोन उपायाने एकाच वेळेस सर्वांना नवे भाडे दर लागू होवू शकतात. प्रमाणीकरणाची अंतिम मुदत डिसेंबर अखेर आहे. त्यात एक महिना वाढ करावी लागेल तोवर या दोन्ही पर्यायांना परवानगी द्यावी, अशी मागणी पंचायतीच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी असे सांगितले की ३१ डिसेंबर पर्यंत पुण्यातील सर्व रिक्षा मीटर रीकॅलिब्रेशन करून पूर्ण होतील. एकसात रिक्षा भाडेवाढ करण्याचा निर्णय स्थानिक प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने घ्यायचा आहे. पुणे प्राधिकरणाचे सदस्य सचिव अजित शिंदे ते हा विषय पाहतील, असे ढाकणे यांनी सांगितले.  याबाबतचे निवेदन प्रत पुन्हा एकदा अजित शिंदे यांनाही देण्यात आली.

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading