fbpx
Tuesday, April 23, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

पुणे : एकीकडे उत्तर भारतात हिवाळा सुरू झाला असताना दुसरीकडे दक्षिण भारतात पावसाने कहर केला आहे. हवामान खात्याने (IMD) अंदाज वर्तवला आहे की 1 डिसेंबरपर्यंत भारतातील 8 राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, आंध्र प्रदेश आणि लक्षद्वीपमध्ये 1 डिसेंबरपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र राज्यातही 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यादरम्यान वारे जोरदार असण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व संलग्न मराठवाडा यामुळे प्रभावित होऊ शकतो, तसेच मुंबई ठाणे,पुणे सहीत. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading