fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

लसीचे दोन्ही डोस न घेतल्यास दंड, लवकरच लागू होणार नवीन नियमावली

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने कडक भूमिका घेतली असून लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या व कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. नविन नियमावलीमध्ये दंडाची रक्कम वाढवली असून लसीकरण न झालेल्यांना 500 रुपयांपासून ते 10 हजारांपर्यंत दंड लावण्यात येणार आहे. लवकरच नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे.

अशी असेल सुधारीत दंड रक्कम :

  • कोविड़ अनुरूप वर्तनाचे पालन न करणान्या कोणत्याही व्यक्तीला असा कसूर केल्याच्या प्रत्येक प्रसंगी रुपये ५००/- इतका दंड करण्यात येईल.
  • सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.
  • एखाद्या संस्थेने कोविड नियमांचे पालन न केल्यास रूपये ५०,०००/- दंड.  वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास संस्था बंद करण्यात येईल.
  • लसीचे दोन्ही डोस न घेता खाजगी किंवा सरकारी वाहनात प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना ५०० दंड
  • सेवा पुरविणारे चाहनचालक, मदतनीस, किंवा वाहक यांना देखील रूपये ५००/- इतका दंड करण्यात येईल. बसेसच्या बाबतीत, मालक परिवहन एजन्सीस, कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी, रुपये १०,०००/- इतका दंड करण्यात येईल.

नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत 100 टक्के पहिल्या डोसचे नियोजन

“राज्यात रोज जवळपास पाच लाख लोकांचे लसीकरण होत आहे. या नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किंवा त्या पुढच्या दहा दिवसांमध्ये राज्यातील 100 लोकांना लसीचा पहिला डोस मिळेल याचे नियोजन करण्यात आलं आहे.”

– राजेश टोपे (राज्य आरोग्यमंत्री )  

फोटो- संग्रही

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading