fbpx
Thursday, April 25, 2024
BusinessLatest News

हौजर को लिव्हिंगकडून वाकड येथे नवीन प्रॉपर्टीचे अनावरण

पुणे  : हौजर हा भारताचा झपाट्याने विकसित होणारा को-लिव्हिंग ब्रॅण्‍ड को-लिव्हिंग स्‍पेसेससाठी आपली उपस्थिती वाढवत आहे. ब्रॅण्‍डला स्थिर कालावधी आणि सामुदायिक व सुरक्षित राहणीमानाची भावना देखील देणा-या किफायशीर निवास व्‍यवस्‍थेसाठी मागणी वाढण्‍याची अपेक्षा आहे. कंपनीने शहराच्‍या महागड्या वाकड परिसरामध्‍ये त्‍यांच्या नवीन प्रॉपर्टीचे अनावरण केले. कंपनीचा वर्ष २०२२ पर्यंत शहरामध्‍ये ६ ते ८ अधिक प्रॉपर्टीज विस्‍तारित करण्‍याचा मनसुबा आहे. आपल्‍या पोर्टफोलिओमध्‍ये या बुटिक प्रॉपर्टीजची भर करण्‍यासोबत सध्‍या हौजर च्‍या एनसीआर, पुणे व हैदराबाद येथे २० हून अधिक प्रॉपर्टीज आहेत आणि कंपनी बेंगळुरू, चेन्‍नई व अहमदाबाद अशा विद्यमान व नवीन शहरांमध्‍ये अधिक प्रमाणात प्रॉपर्टीज लाँच करण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.

ट्विन शेअरिंगसाठी भाडे १२००० ते १७००० रूपये, तर सिंगल ऑक्‍युपन्‍सीसाठी भाडे २३००० ते ३०००० रूपये आहे. यासह को-लिव्हिंग अग्रणी कंपनी शहरामध्‍ये विविध फॉर्मेट्समध्‍ये ४०० हून अधिक बेड्सची सुविधा देणार आहे.उद्योजक, नवप्रवर्तक, परिवर्तन घडवून आणणारे आणि असाधारण जीवनशैली राखण्‍याचा प्रयत्‍न करणारे अशा वैविध्‍यपूर्ण समूहाने हौजर प्रॉपर्टीजना प्राधान्‍य दिले आहे. प्रॉपर्टीजमध्‍ये हवेशीर रूम्‍स व शांतमय सौंदर्यता, आरामासाठी व्‍यापक जागांचा समावेश आहे. आजच्‍या तंत्रज्ञानप्रेमी व्‍यावसायिकांच्‍या गरजांना अनुसरून असलेल्‍या आधुनिक लिव्हिंग स्‍पेसेसची गरज ओळखत कंपनी सर्व सुविधा घेऊन येत आहे, ज्‍यामध्‍ये पूर्णत: फर्निश केलेल्‍या व व्‍यवस्‍थापित रूम्‍स, वाय-फाय, लॉण्‍ड्री, एफअँडबी (भोजन), सामुदायिक कार्यक्रम आणि लाऊंज, जिम, कॅफेटेरिया यांसारख्‍या क्षेत्रांची उपलब्‍धता अशा सुविधा एकाच छताखाली सर्वात किफायतशीर दरांमध्‍ये आहेत.

२०१८ मध्‍ये दीपक आनंद व कल्‍पेश मेहता यांनी स्‍थापना केलेल्‍या हौजर ला गुंतणूकदार अदर पूनावाला यांचे रायजिंग सन होल्डिंग्‍जच्‍या माध्‍यमातून, तसेच पिरोज्‍शा गोदरेज, अभिषेक लोढा व हर्ष पतोडिया यांचे पाठबळ आहे.या विस्‍तारीकरणाबाबत बोलताना हौजरचे सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक आनंद म्‍हणाले की आम्‍हाला पुण्‍यामध्‍ये आमच्‍या प्रॉपर्टीज लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. कोविड निर्बंधांमध्‍ये शिथीलता आणण्‍यासह लोक पुन्‍हा त्‍यांच्‍या कार्यालयांमध्‍ये परतत आहेत आणि सर्वोत्तम संधींसाठी दुस-या शहरांमध्‍ये स्‍थलांतर देखील करत आहेत. आयटी कंपन्‍या व तंत्रज्ञान स्‍टार्ट-अप्‍सचे पसंतीचे शहर असलेल्‍या पुण्‍यामध्‍ये सकारात्‍मक बाजारपेठ भावना दिसून येत आहे आणि निश्चितच या शहरामध्‍ये रिअल इस्‍टेट, को-लिव्हिंग व रेण्‍टल्‍ससाठी प्रचंड क्षमता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading