fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

रंगली वडील -मुलांची अनोखी व्हर्च्‍युअल पाककला स्पर्धा

पुणे : ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूल, पुणे (हडपसर) कॅम्‍पसने नुकतेच अर्ली चाइडल्‍डहूड विद्यार्थ्‍यांसाठी ‘विविधतेमध्‍ये एकता’ या थीमवर आधारित ऑनलाइन इव्‍हेण्‍ट – वडिल-मुलांसाठी पाककला स्‍पर्धेचे आयोजन केले. या स्‍पर्धेमध्‍ये जवळपास १०८ पालकांनी सहभाग घेतला, ज्‍यामधून महाराष्‍ट्रीयन मोदकांपासून बनारसी भेळपर्यंत वैवि‍ध्‍यपूर्ण भारतीय पाककला पहायला मिळाल्या.

ही अनोखी व्‍हर्च्‍युअल पाककला स्‍पर्धा शाळेच्‍या आश्रयांतर्गत असलेल्‍या फाऊंडेशनच्‍या २०व्‍या वर्धापन दिन साजरीकरणाचा भाग होती. स्‍पर्धेसाठी अनेक प्रवेशिका मिळाल्‍या, पण विजेत्‍या पाककला ठरल्‍या गोवन-स्‍टाइल सलाड, पान-फ्लेवर्ड कोकोनट लाडू, नट्स बनाना बाइट्स, स्रॉऊट्स सलाड बोट, बनारसी भेळसह डेट्स मिल्‍क शेक. भारतीय संस्कृतीतील विविधतेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देणे हा यामागचा उद्देश होता. स्थानिक संस्कृती, भौगोलिक स्थानांमधील फरकांमुळे भारतातील विविध प्रदेशांमध्ये पाककृती वेगवेगळ्या आहेत. जीआयआयएस हे भौगोलिक क्षेत्रांमधील विद्यार्थ्यांसह मिनी-इंडियाचे संयोजन आहे.

याप्रसंगी बोलताना भारतातील ग्‍लोबल इंडियन इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या (जीआयआयएस) कार्यसंचालनांचे संचालक राजीव बंसल म्‍हणाले, ”या स्‍पर्धेच्‍या माध्‍यमातून जीआयआयएसिन्‍सनी पाककलेच्‍या संदर्भात भारतामध्‍ये असलेल्‍या विविधतेची झलक दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. जीआयआयएस हडपसरचे पालक नेहमीच शाळेने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमांमध्‍ये सहभाग घेण्‍यास अग्रस्‍थानी राहिले आहेत आणि आम्‍हाला आज असलेल्‍या टप्‍प्‍यावर पोहोचण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आधुनिक नवोन्‍मेष्‍कारी अध्‍ययन साधनांसह औपचारिक शिक्षणाच्‍या मुलभूत गोष्‍टींचे ज्ञान देत आमच्‍या अध्‍यापन पद्धती आमच्‍या विद्यार्थ्‍यांना प्रचंड वाढ व विकास संधी देतात.”

 

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading