fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsTECHNOLOGY

‘वी’ ने सादर केले नवे टॅरिफ प्लॅन्स

मुंबई : भारतातील आघाडीची टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपनी वोडाफोन आयडिया लिमिटेडने (व्हीआयएल) भारतातील प्रीपेड युजर्ससाठी नवीन टॅरिफ प्लॅन्स सुरु करत असल्याची घोषणा आज केली. हे नवीन प्लॅन्स २५ नोव्हेंबर २०२१ पासून उपलब्ध होतील.

वीचे नवीन टॅरिफ प्लॅन्स एआरपीयु सुधारणेची प्रक्रिया सुरु करतील तसेच उद्योगक्षेत्राला भेडसावत असलेल्या आर्थिक ताणतणावांचे निवारण करण्यात मदत करतील. 

या टॅरिफ प्लॅन्समुळे व्हीआयएलला भारताच्या सर्वाधिक वेगवान मोबाईल नेटवर्कमध्ये सातत्यपूर्ण सुधारणा घडवून आणता येतील.  फिक्स्ड ब्रॉडबँड आणि मोबाईल नेटवर्क टेस्टिंग ऍप्लिकेशन्समधील जागतिक पातळीवरील सर्वात आघाडीची कंपनी ऊकला®ने या नेटवर्कला सत्यापित केले आहे. सरकारचे डिजिटल भारत उद्धिष्ट साकार करण्याचा वेग वाढवण्यात आपली भूमिका बजावण्यासाठी वी वचनबद्ध आहे.

आपल्या ग्राहकांना सहजसोपी आणि अतिशय सुविधाजनक उत्पादने देण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अनुसरून वीने व्हॉइस आणि डेटा या दोन्हींसाठी सुविधाजनक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशा प्लॅन्सची सर्वात जास्त अनुकूल श्रेणी तयार केली आहे.  आपल्या गरजा पूर्ण करू शकेल असा प्लॅन यामधून निवडून ग्राहक त्याचे लाभ घेऊ शकतील.   

अधिक माहितीसाठी युजर्स २५ नोव्हेंबर २०२१ पासून www.myvi.inला भेट देऊ शकतात.   

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading